Vaijapur Crime : लासुरगांवात तरुणाच्या खुनाने उडाली खळबळ

वैजापूर तालुक्यातील लासुरगाव येथे शिवना नदीच्या पात्राच्या जवळ एका तरुणाचा खुन झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २८) सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली.
Murder
MurderSakal
Summary

वैजापूर तालुक्यातील लासुरगाव येथे शिवना नदीच्या पात्राच्या जवळ एका तरुणाचा खुन झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २८) सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली.

वैजापूर - तालुक्यातील लासुरगाव येथे शिवना नदीच्या पात्राच्या जवळ एका तरुणाचा खुन झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २८) सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.‌ दरम्यान, खून झालेल्या तरुणाची ओळख पटली असुन कृष्णा पोपट हरिश्चंद्रे (वय २६, रा. लासुरगांव) असे मृताचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर उपविभागाच्या सहायक पोलिस अधिक्षक महक स्वामी, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, उपनिरीक्षक मनोज पाटील, हेड कॉन्स्टेबल किरण गोरे, पोलिस अंमलदार प्रशांत गिते, गणेश कुलट, गणेश पैठणकर, गोपाल जाणवाल, दिनेश गायकवाड यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लासुरगांव येथील नदीपात्रात कडेला यात्रेतील पाळण्याच्या जवळ कृष्णा हरिश्चंद्रे यांचा मृतदेह आढळुन आला.‌

गुरुवारी अपरात्री ही घटना घडल्याची शक्यता असुन यामागचे नेमके कारण काय आहे याची माहिती लगेच मिळु शकली नाही. मात्र पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत एका संशयितास ताब्यात घेतले असुन अन्य आरोपीचा शोध सुरु आहे. एमएलसी अहवालावरून लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com