पाण्यात वाहून जाणाऱ्या मुलीला तरुणाने वाचविले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नदीवर मैत्रिणीबरोबर कपडे धुवत असताना पाय घसरून नदीमध्ये वाहून जाणाऱ्या मुलीस एका तरुणाने नदीत उडी घेऊन वाचविल्याची घटना रविवारी (ता.29) सकाळी अकराच्या सुमारास वरठाण (ता. सोयगाव) येथे घडली. वाहून गेलेल्या मुलीचे नाव तौशिम अशपाक खान (वय 10) असे असून अस्लम पठाण वाचविणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

बनोटी (जि.औरंगाबाद) ः नदीवर मैत्रिणीबरोबर कपडे धुवत असताना पाय घसरून नदीमध्ये वाहून जाणाऱ्या मुलीस एका तरुणाने नदीत उडी घेऊन वाचविल्याची घटना रविवारी (ता.29) सकाळी अकराच्या सुमारास वरठाण (ता. सोयगाव) येथे घडली. वाहून गेलेल्या मुलीचे नाव तौशिम अशपाक खान (वय 10) असे असून अस्लम पठाण वाचविणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

बनोटी परिसरात परतीच्या पावसाने कहर केला असून दररोज पावसाच्या सरी कोळसत आहेत. त्यामुळे परिसरातील छोटे-मोठे तलाव भरल्याने नद्या खळखळून वाहत आहेत. परिसरातील सर्वांत मोठी नदी असलेली हिवरा नदी सप्टेंबर महिन्यात नियमित पाणीपातळीपेक्षा एक मीटर अधिकने वाहत आहे. त्यामुळे नदीत जाण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. वरठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात शिकणारी मुलगी तौशिम खान रविवारी शाळेला सुटी असल्याने आईस मदत म्हणून कपडे धुण्याकरिता मैत्रिणीसोबत सकाळी हिवरा नदी तिरावर गेली होती. कपडे धुवत असताना कपडा वाहून गेल्याने त्यास पकडण्यासाठी गेली असता पाय घसरून तोल गेल्याने पाण्याच्या प्रवाहात पडली. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने वाहून जात असताना रस्त्याने जाणारा असलम पठाण या तरुणाने पाहिले आणि क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा जीव धोक्‍यात घालून नदीमध्ये उडी घेऊन मुलीस सुरक्षित किनारी आणत प्राण वाचविले.

दोन मुलींना वाचविण्यात यश
हिवरा नदीच्या प्रवाहात सप्टेंबर महिन्यात पाचोरा (जि. जळगाव) येथील सुधीर महाजन, सतीश पाटील वाहून गेल्याने मृत्यू झाला. वनगाव येथील शाळकरी मुलगी शुभांगी गव्हाले या मुलीस वाचविण्यात यश आले. परतीच्या पावसाने नदी-नाल्यांना केव्हाही पूर येऊ शकतो. तरी गावातील ग्रामस्थांनी पाण्याचा प्रवाहात जाणे टाळावे आणि किनारी लहान मुलांसोबत जाण्याचे आवाहन सरपंच सागर खैरनार यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Saved Girl Who Flowing Into Water