औरंगाबाद: अंबरहिल येथे तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

शनिवारी सकाळी अमोल रूम मधून  बाहेर न आल्याने पाहण्यासाठी गेले असता अमोलने गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

औरंगाबाद : अंबरहिल येथील अमोल अशोक मिसाळ या  24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.7) सकाळी उघडकीस आली. दुपारपर्यंत आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल हा एका पिझ्झा च्या शोरूम मध्ये काम करीत होता. मात्र काही काळा पासून त्याने तेथील नोकरी सोडली होती. तेंव्हा पासून तो घरीच होता. शुक्रवारी रात्री अमोल ने जेवण केले काही वेळ टीव्ही पाहिल्यानंतर तो त्याच्या खोलीत झोपायला गेला. 

शनिवारी सकाळी अमोल रूम मधून  बाहेर न आल्याने पाहण्यासाठी गेले असता अमोलने गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: youth suicide in Aurangabad

टॅग्स