आजोबा तुमच्या जिद्दीला सलाम; नातवाला शिकवण्यासाठी कॅलेंडरविक्रीतून स्वप्नाकडे प्रवास

grandfather selling calender
grandfather selling calender

औसा (जि.लातूर) : सडपातळ बांधा, डोळ्याला काळा चष्मा, डोक्याला लोकरी टोपी, पिशवीत वेगवेगळ्या दिनदर्शिकांच्या वळकट्या तर उजव्या हातावर तेवढीच कॅलेंडरे... रस्त्याच्या एका बाजूने निघालेले औशाचे पंचाहत्तरवर्षिय आजोबा नववर्षाच्या आगोदर एक महिन्यांनी नवीन वर्षाचे कॅलेंडर पायी चालत विक्री करतात. त्यांचा हा नियम गेल्या एकतीस वर्षापासुन सुरु आहे.

आजही ते तेवढ्याच कष्टाने आणि न दमता काम करतात. त्यांचा कायम ठिकाणा कुठंच नसतो ते कधी या रस्त्यावर तर कधी वेगळ्याच गल्लीत दिसतात. त्यामुळे औसा परिसरातील आनेक लोक हे आजोबा दिसले की त्यांच्याकडून नवीन वर्षाचे कॅलेंडर घेतात. आपल्या नातवाच्या स्वप्नांसाठी वयाच्या पंचाहत्तरीतही सुरु असलेला या आजोबांचा प्रवास आनेक रिकामटेकड्या तरुणांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

औसा येथील चंद्रकांत देवीदास नाईक वय पंचाहत्तर वर्षे हे गेल्या तीस वर्षाहून अधिक काळापासुन शहरात फिरुन नवीन वर्षाचे कॅलेंडर विक्री करतात. त्यांना एका कॅलेंडरमागे पाच रुपये मिळतात. उतारवयात आता त्यांना मेहनतीचे काम होत नसल्याने त्यांनी कॅलेंडरविक्री सुरुच ठेवली आहे.

खरे तर या वयात सर्व कामापासून व दगदगीपासून अनेकजण निवृत्ती घेतात पण चंद्रकांत नाईक हे या वयातही स्वतःला व्यस्त ठेवतात. ते म्हणतात की, शरीराला एकदा अराम करण्याची सवय लागली की मग अनेक व्याधी मागे लागतात. दवाखाना आणि उपचार यावर खर्च तर होतोच पण आजारी पडलो की कुटुंबातील लोकांनाही याचा त्रास होतो म्हणून शरीराला काम दिले पाहिजे याचा दुहेरी फायदा एकतर प्रकृती ठीक राहते आणि चार पैसे पण मिळतात.

आजोबांचा नातू दहावीत आहे त्याला मदत करण्यासाठी ते थंडीतही दिवसभर गल्लोगल्ली फिरून कॅलेंडर विक्री करतात. अंगात ताकत आणि करण्यासारखं सर्वकांही असताना जे रिकामटेकडे जीवन जगतात त्यांच्यासाठी नाईक आजोबा एक प्रकारे अंजन घालत आहेत. आजोबा दिलेले की अनेकजण त्यांच्याकडून कॅलेंडर खरेदी करतांना दिसतात.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com