Maratha Reservation : युवासेना जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेती यांचा राजीनामा, मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षाचे काम करणार नाही

मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र व ओबीसी संवर्गातून आरक्षणासाठी उपोषण, आमरण उपोषण व रास्तारोको आंदोलन
Maratha Reservation
Maratha Reservationsakal

वसमत : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. साखळी उपोषण, आमरण उपोषण, रास्तारोको आंदोलनाबरोबरच आता राजकीय राजीनामा सत्र सुरू झाले आहे. बुधवारी ता. एक युवासेना जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेती यांनी आपला पदाचा राजीनामा जिल्हा युवा समन्वयक कृष्णा पाटील आष्टीकर यांना दिला आहे.

मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र व ओबीसी संवर्गातून आरक्षणासाठी उपोषण, आमरण उपोषण व रास्तारोको आंदोलन केले जात आहे. एका आंदोलनकर्त्यांने तहसिलदार यांच्या दालनात पंख्याला फाशी घेण्याचा प्रयत्न केला.

तसेच दोन युवकांनी स्वतःला जाळून घेतले. तालुक्यात आंदोलन दिवसेंदिवस तापत असून आता राजकीय पदाधिकारी यांच्याकडून आरक्षणासाठी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिल्याऩतर बुधवारी युवासेना जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेती यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे.

त्यांनी आपल्या राजिनाम्यांत मराठा समाजास आरक्षण करीता आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांनी सुरु केले आहे. मराठा समाजाचा एक घटक म्हणून मला कुठल्याही पक्षाचा एक राजकीय पदाधिकारी राहणे मनाला पटत नसल्याने मी युवासेना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. तसेच मराठा समाजास जोपर्यंत सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत मी समाजाशी एकनिष्ठ राहून त्यांना माझा माझा पुर्ण पाठिंबा राहील असेही राजीनामात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com