संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : आदित्य ठाकरे 

पांडुरंग उगले 
रविवार, 4 ऑगस्ट 2019

गटबाजीचेही प्रदर्शन 
​आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा माजलगाव तालुक्यात आली त्यावेळी माजी तालुकाप्रमुख सतीश सोळंके यांनी गंगामसला येथे सेनेचा एक गट घेऊन स्वागत केले. याठिकाणी लावलेल्या बॅनरवर तालुकप्रमुखांचाच फोटो लावण्यात आला नव्हता. तर दुसऱ्या ठिकाणी तालुकप्रमुखांनी केलेल्या स्वागत कार्यक्रमात माजी तालुकाप्रमुखांचा गट गैरहजर राहिल्याने आदित्य ठाकरेंसमोरच सेनेतील गटबाजीचे प्रदर्शन झाले.

माजलगाव (बीड) : तुम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करीत असला तरी तुमच्या अडचणी शिवसेना सोडवायला तयार आहे. जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होऊन त्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही असे आवाहन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

शिवसेनेने महाराष्ट्रात काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेचे रविवारी (ता.4) शहरात आगमन झाले असता त्यांच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत फलोत्पादनमंत्री जायदत्त क्षीरसागर, चंद्रकांत खैरे, जिल्हा प्रमुख सचिन मूळुक, तालुकाप्रमुख अप्पासाहेब जाधव, विठ्ठल जाधव यांच्यासह कार्यकरे मोठ्यासंख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी यात्रा सुरू केल्यापासून ठिकठिकाणी थांबवून माझे स्वागत होत असताना मला अडचणी सोडविण्यासाठी निवेदन देणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. कारण ज्याच्यावर जास्त विश्वास असतो. राज्यातील ही जनता शिवसेनेवर मोठा विश्वास दाखवत असल्याचा मला अभिमान आहे. यावेळी तालुकाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तालुक्यातील गरीब शेतकऱ्यांना दहा गायीचे मोफत वाटप करण्यात आले.

गटबाजीचेही प्रदर्शन 
आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा माजलगाव तालुक्यात आली त्यावेळी माजी तालुकाप्रमुख सतीश सोळंके यांनी गंगामसला येथे सेनेचा एक गट घेऊन स्वागत केले. याठिकाणी लावलेल्या बॅनरवर तालुकप्रमुखांचाच फोटो लावण्यात आला नव्हता. तर दुसऱ्या ठिकाणी तालुकप्रमुखांनी केलेल्या स्वागत कार्यक्रमात माजी तालुकाप्रमुखांचा गट गैरहजर राहिल्याने आदित्य ठाकरेंसमोरच सेनेतील गटबाजीचे प्रदर्शन झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuvesena chief Aditya Thackeray talked about farmer loan waiver