Vipin Itankar
Vipin Itankar

गुरू को मात नही देगा.. वह शिष्य कैसा? जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना

लातूर : येथे रूजू झाल्यापासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी अडीच वर्ष जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची सोबत केली. दोघांची मैत्री वाढत गेली. मोठा भाऊ आणि गुरू म्हणून डॉ. ईटनकर यांनी श्रीकांत यांच्याकडून शिकवण घेतली. त्याचे फलित त्यांना नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती मिळाली. मित्र आता प्रतिस्पर्धी झाला असला तरी तुम्ही सर्व बाबतीत लातूरच्या पुढे जाणार नाहीत, असे श्रीकांत यांनी सांगितले. त्यावर `गुरू को मात नही देगा, वह शिष्य कैसा?`, असा प्रश्न उपस्थित करून नांदेडला लातूरच्या पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.


जिल्हा परिषदेत सोमवारी (ता.२४) त्यांचा सत्कार आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची आठवण देऊन गेला. जिल्हाधिकारी श्रीकांत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, बांधकाम सभापती संगीता घुले, कृषी सभापती गोविंद चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, डॉ. शालिनी ईटनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.गव्हाणे, श्री. जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, सदस्य महेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

श्रीकांत यांनी त्यांच्या सहवासातील अनेक क्षण टिपले. दोघांच्या मैत्रीतील धागे उलगडून सांगताना त्यांना गहिवरून आले. अनेक प्रसंगातून डॉ. ईटनकर यांची जडणघडण करताना त्यांना स्वतः निर्णय घेण्यास भाग पाडले. दोघांचे घट्ट नाते तयार झाले. चांगला शिष्य तयार करता आल्याचे सांगून आता आम्ही प्रतिस्पर्धी झाल्याचे त्यांनी नमुद केले. काही बाबतीत नांदेड पुढे राहिल. मात्र, लातूर नेहमीच आघाडीवर राहिल, हे सांगायला ते विसरले नाहीत. सत्काराला उत्तर देताना डॉ. ईनटकर यांनी नांदेडला पुढे घेऊन गेलो तरच तुमची अर्थात गुरूची उंची वाढेल, असे सांगितले. थोरला भाऊ म्हणून श्रीकांत यांनी दिलेल्या शिकवणीला त्यांनी उजाळा दिला. सर्वांच्याच सहकार्याने चांगले काम करता आल्याचे सांगून जिल्हाधिकारी तसेच यापुढील काळात लातूरची शिदोरी नेहमीच कामाला येईल, असेही त्यांनी नमूद केले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com