बीड : जलजीवनच्या कामाची सीईओंकडे तक्रार

वारोळा ः दर्जाहीन कामाचा ग्रामस्थांचा आरोप, चौकशीची मागणी
Zilla Parishad Jaljivan Water supply scheme Complaint of work to CEO
Zilla Parishad Jaljivan Water supply scheme Complaint of work to CEOsakal

तालखेड : माजलगाव तालुक्यातील वारोळा (तांडा) येथे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी यासाठी जिल्हा परिषद जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाची चौकशी करत संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. पाणीपुरवठा योजनेचे काम उत्कृष्ट दर्जाचे करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

सदर योजनेत काम पूर्ण करण्यासाठी गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असून या योजनेचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे न करिता केवळ संबंधित गुत्तेदार आणि अधिकारी यांना पुरेपुर फायदा होईल अशा पद्धतीने सुरु आहे. तसेच पाइपलाइनमध्ये सिमेंट काँक्रीटचे बेड करण्याची गरज असताना ते करण्याचे जाणीवपूर्वक टाळले जात आहे. पाइपलाइन खोदण्याचे काम कमी उंचीचे करण्यात आले असून हे काम दिवसा करण्याऐवजी रात्रीच्या वेळी शासकीय अधिकारी यांच्या संगनमताने कमी खोलीच्या खड्यात पाईप टाकून संबंधित गुत्तेदाराने केले आहे.

या कामाच्या अंदाजपत्रकानुसार नवीन स्वतंत्र विहीर आणि नवीन पाण्याची टाकीचे बांधकाम करणे नमुद असताना देखील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या विहिरीवरून ही पाइपलाइन करण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थांना कमी दाबाने पाणीपुरवठा होईल व भविष्यात पाणीटंचाईला देखील सामोरे जावे लागणार आहे. या कामात संबंधित गुत्तेदार हे बोगस पद्धतीने काम करत असून संबंधित गुत्तेदार व अधिकारी यांची चौकशी करावी व त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. हे काम चांगल्या व टिकाऊ दर्जाचे करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद बीड यांना निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर बापूराव तौर, चक्रधर थेटे, प्रकाश चव्हाण, रमेश राठोड, कैलास पवार आदींची नावे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com