esakal | उमरग्यातील जिल्हा परिषद शाळांना न्यूट्रिटीव्ह स्लाईसचे वितरण! | Mid Day Meal
sakal

बोलून बातमी शोधा

उमरगा (जि. उस्मानाबाद) : आता शालेय शिक्षण विभागाच्या शालेय पोषण आहार म्हणुन न्यूट्रिटीव्ह स्लाईस (बिस्कीट पुड्यांचा) बुधवारी (ता.सहा) उमरगा तालुक्यातील  सर्व केंद्रांना पुरवठा होणार आहे.

उमरग्यातील जिल्हा परिषद शाळांना न्यूट्रिटीव्ह स्लाईसचे वितरण!

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : कोरोनाच्या (Corona) स्थितीमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर सोमवारपासुन (ता. चार) शाळा सुरू झाल्या. आता शालेय शिक्षण विभागाच्या शालेय पोषण आहार (Midday Meal) म्हणुन न्यूट्रिटीव्ह स्लाईस (बिस्कीट पुड्यांचा) बुधवारी (ता.सहा) उमरगा तालुक्यातील सर्व केंद्रांना पुरवठा होणार आहे. शालेय पोषण आहारात आता तांदुळ दिला जाणार नाही. बिस्किटचा पुरवठा फक्त जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad Schools) शाळांना होणार आहे. प्रत्येक पॅकेट हे एकसारख्या वजनाचे (१२०ग्रॅम) आहे, इयत्ता पहिली ते पाचवीसाठी प्रति विद्यार्थी तांदूळ घटक - एक, सोयाबीन घटक - एक, बाजरी घटक -एक, ज्वारी घटक - दोन आणि नाचणी घटक- एक असे एकूण सहा पॅकेट दिले जाणार आहेत, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या प्रति विद्यार्थीसाठी तांदूळ घटक - एक, सोयाबीन घटक - दोन, बाजरी घटक - दोन, ज्वारी घटक - दोन, नाचणी घटक- दोन असे एकूण नऊ पॅकेट दिले जात आहेत.

हेही वाचा: बनवा पनीर कोरमा, जाणून घ्या रेसिपी

तुगाव शाळेचे विद्यार्थी ब्रॅन्ड अॅम्बेसिडर !

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या शालेय पोषण आहार योजनेत दिल्या जाणाऱ्या पौष्टीक बिस्किटाच्या पुड्यावर तुगावच्या जिल्हा परिषद शाळेतील सुरज दुशंत शिंदे (इयत्ता पाचवी), सोनाक्षी सचिन इगवे (इयत्ता चौथी) या विद्यार्थ्यांचे फोटो झळकले आहेत. शालेय पोषण विभागाने संपूर्ण राज्यभरातुन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे फोटो मागविले होते. त्यात या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली. गटशिक्षण अधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा: पुणे : शेतकरी कुटुंबातल्या मुलाचं आयएएस होण्याचे स्वप्न साकार

loading image
go to top