ramesh pawar
sakal
चित्तेपिपंळगाव - आडगाव बुद्रुक (ता. छत्रपती संभाजीनगर) गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले शिवसेना (शिंदे गट) चे रमेश पवार हे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुखपदी विराजमान झाले आहेत.
खासदार संदिपान भुमरे यांच्या हस्ते ही नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीतील बंडखोरीनंतर त्यांची जिल्हाप्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, वर्षभरानंतर पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.