हिंगोलीत गटशिक्षणाधिकारी कार्यालयात विद्यार्थांचे बे एक बे

मंगेश शेवाळकर
सोमवार, 9 जुलै 2018

हिंगोली - तालुक्‍यातील भिंगी येथील जिल्‍हा परिषद शाळेतील प्रतिनियुक्‍ती झालेल्‍या शिक्षकास परत  शाळेवर द्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता.९) हिंगोलीच्‍या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा भरली. विद्यार्थ्यांनी बे एके बे सोबत अभ्यासही केला. दुपारी उशिरापर्यंत कार्यालयात अधिकारी आले नव्‍हते.

तालुक्‍यातील भिंगी येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जिल्‍हा परिषद शाळा असून २१० विद्यार्थी शिक्षण घेतात. या ठिकाणी सात शिक्षक कार्यरत आहेत. त्‍यापैकी एक शिक्षक रजेवर आहे. तर एका शिक्षकाची जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍थेत प्रतिनियुक्‍ती करण्यात आली आहे. त्‍यामुळे अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेतील प्रतिनियुक्‍त केलेल्‍या शिक्षकास परत शाळेत पाठवावे या मागणीसाठी गावकऱ्यांनी शिक्षण विभागाकडे निवेदन दिले होते. मात्र शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने घेतले नाही. 

दरम्‍यान, आज सकाळी गावकरी शंकर वाबळे, प्रदीप वाबळे, दिलीप कांबळे, राहूल कांबळे, गंगाधर आगलावे, जेजेराम आगलावे, विष्णू आगलावे, भानूदास आगलावे, सुरेश पाटील, शाम दंडे, मोहन दंडे यांनी विद्यार्थ्यांना घेवून गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठले. या ठिकाणी सकाळी दहा वाजता शाळा भरवली. विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे पाढेही म्‍हणले. तसेच इतर अभ्यासही केला. दुपारपर्यंत 
येथे एकही अधिकारी आले नाही. शिक्षकाची नियुक्‍ती होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्‍याचे गावकरी शंकर वाबळे यांनी सांगितले.

Web Title: ZP school Students of Hingoli Group Education Officer