झेडपीच्या शाळेतील शिक्षकांचा तिढा सुटेना !

भास्कर बलखंडे
शुक्रवार, 27 जुलै 2018

जालना : शिक्षकांच्या आॅनलाईन पध्दतीने बदल्या झाल्याने निर्माण झालेल्या शैक्षणिक अडचणींमुळे जिल्ह्यातील सुमारे 1534 शाळा व त्यात शिक्षण घेणारे दहा हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्य दावणीला टांगले आहे. जिल्ह्यात अद्यापही सुमारे साडेतीनशे शिक्षकांची गरज आहे. राज्य शासनाने शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन पध्दतीने केल्याने यार्षी 246 शिक्षकांना जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शाळेतून सोडण्यात आले.

या प्रक्रियेतून जिल्ह्याला केवळ  60 शिक्षकच मिळाले आहेत. त्यामुळे  शिक्षकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा होऊन शासनाकडून अद्याप शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या दिशेने ठोस निर्णय होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील नऊ शाळेत मात्र प्रत्येकी एका शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंरतु विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि शाळांची संख्या लक्षात आणखी साडेतीनशे शिक्षकांची गरज आहे. यासाठी त्यांनी पालक संघर्ष समितीची स्थापना केली. दरम्यान शिक्षकांचा तिढा सुटावा, यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य जयमंगल जाधव यांनी पुढाकार घेतला आहे.

या प्रश्नाकडे त्यांनी पालक संघर्ष समितीची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील विविध शाळेत देण्यात यावेत यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार विक्रम काळे यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली. जिल्ह्यात शिक्षक कमी असल्याचे सीईअोच्याही निदर्शनास आणून देण्यात आले असल्याचे मंगल जाधव यांनी सांगितले.

Web Title: ZP School Teacher Problems not solved yet