
क्रिकेट हे आता फक्त मुंबई-पुण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. महाराष्ट्रातील गावा-खेड्यातून आता प्रतिभावान खेळाडू पुढे येत आहेत, आपली ओळख निर्माण करत आहेत.असाच एक उदयोन्मुख खेळाडू आहे अहमदनगरचा १९ वर्षांखालील किरण चोरमले.
वडिलांकडून प्रेरणा घेत क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न किरण पाहातोय. सध्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये रत्नागिरी जेट्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किरणने विविध स्तरावर त्याच्या कामगिरीने प्रत्येकवेळी सर्वांना प्रभाविक केले.
त्याच्या कामगिरीमुळे त्याने १९ वर्षांखालील आशिया चषकात भारतीय संघाचे उपकर्णधारपदही सांभाळले. त्याच्या कारकिर्दीत रत्नागिरी जेट्स संघाचाही महत्त्वाचा वाटा राहिला. त्यांच्या जेट्स क्लबने त्याला लहान वयातच स्पर्धात्मक क्रिकेटचा बहुमोल अनुभव दिला. त्याच्या या प्रवासात त्याचे प्रशिक्षक, कुटुंब आणि मित्रपरिवाराचीही त्याला साथ मिळाली. या प्रवासाबद्दल 'सकाळ डिजिटल'ने त्याच्याशी साधलेला हा संवाद.