Maharashtra Premier League 2025 : पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बुधवारपासून महाराष्ट्र प्रीमियर लीग ( MPL 2025) व वूमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL 2025 ) या स्पर्धांचा थरार रंगणार आहे. एमपीएलमुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतील सर्वसामान्य कुटुंबातील नवोदित गुणवान खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत असल्याचे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सांगितले.