
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत गुरुवारी रायगड रॉयल्सने सातारा वॉरियर्सविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे झालेल्या या सामन्यात रायगड रॉयल्स २४ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे आता रायगडच्या खात्यातही दोन गुण जोडले गेले आहेत.
या सामन्यात रायगडने प्रथम फलंदाजी करताना साताऱ्यासमोर १९१ धावांच्या लक्ष्य समोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना सातारा वॉरियर्सला २० षटकात ७ बाद १६६ धावाच करता आल्या. रायगडच्या विजयात निखिल कदम, कर्णधार ऋषभ राठोड व ऋग्वेद मोरे यांनी मोलाचा वाटा उचलला.