WMPL 2025: स्मृती मानधना एकटी लढली, पण अर्धशतकी झुंज अपयशी; पुणे वॉरियर्सकडून रत्नागिरी जेट्सचा पराभव

Pune Warriors vs Ratnagiri Jets : महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत पुणे वॉरियर्सने रत्नागिरी जेट्सवर थरारक विजय मिळवला. रत्नागिरीची कर्णधार स्मृती मानधनाचे अर्धशतक व्यर्थ ठरले.
Smriti Mandhana | WMPL 2025
Smriti Mandhana | WMPL 2025Sakal
Updated on

महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (८ जून) पुणे वॉरियर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाविरुद्ध रोमांचक विजय मिळवला. पुणे वॉरियर्सने शेवटच्या चेंडूवर ५ धावांनी विजय मिळवला. रत्नागिरीची कर्णधार स्मृती मानधनाची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.

या सामन्यात पुणे वॉरियर्सने रत्नागिरी जेट्सला १५२ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना रत्नागिरी जेट्सला २० षटकात ८ बाद १४६ धावाच करता आल्या. पुण्याकडून चिन्मयी बोरपाळेने शानदार गोलंदाजी केली.

Smriti Mandhana | WMPL 2025
WMPL 2025 : पुणे वॉरियर्स संघाचा दणदणीत विजय, रायगड रॉयल्सवर ८ विकेट्सने मात; चिन्मयीची भन्नाट गोलंदाजी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com