चिन्मयी बोरपाळे आणि समृद्धी दळे यांच्या उल्लेखनीय गोलंदाजीच्या जोरावर पुणे वॉरियर्सने महिला महाराष्ट्र प्रीमिअर लीग २०२५ ( WMPL) मध्ये शुक्रवारी रायगड रॉयल्सचा सहज पराभव केला. रायगडला २० षटकांत ८ बाद १०२ धावांवर रोखल्यानंतर पुणे संघाने १४.५ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यास हे लक्ष्य सहज पार केले.