
क्रिकेटमध्ये ताळमेळ नसला की फलंदाज धावबाद झालेला अनेकदा पाहिलाच असेल. कधी आपल्याच चुकीमुळे, तर कधी साथीदाराच्या चुकीमुळे अशा धावबादच्या घटना घडतात आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याने मैदानात कधी काय घडेल याचा अंदाज बांधता येत नाही.
बऱ्याचदा अशा अनोख्या घटना क्रिकेटच्या मैदानात होतात आणि आता तर त्यांचे व्हिडिओही व्हायरल होत असतात. सध्या महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे सुरू आहे. या स्पर्धेतही अशा घटना घडताना दिसत आहे.