प्रवास चित्रपटातील स्थित्यंतराचा

vinod khanna.
vinod khanna.

बॉलिवूडच्‍या महानायकाचा प्रवास नायक ते महानायक, बीग बी सदि के महानायक... असा सुरू झाला. त्‍यांच्‍या भूमिका या सामान्‍य, अतिसामान्‍य माणसाला भिडल्‍या. त्‍यांच्‍या आत दडलेला आक्रोश बाहेर आणणारा नायक पडद्यावर दिसला आणि अमिताभ बच्‍चन सुपर हीट झाला. प्रेक्षक आपली आवड बदलतात त्‍याप्रमाणे हिरो, हिरोइन, चित्रपटाचे नशीब बदलत असत.

उदा. ज्‍या प्रेक्षकांनी राजकपूरच्‍या व्‍यावसायिक चित्रपटांना प्रचंड गर्दी केली त्‍याच प्रेक्षकांनी ‘मेरा नाम जोकर’कडे पाठ फिरवली आणि प्रेक्षकांना आपल्‍याकडे परत वळवण्‍यासाठी राजकपूरना ‘बॉबी’ चित्रपट काढावा लागला. तो त्‍या काळातल्‍या समाजाचे प्रतिनिधीत्‍व करणारा चित्रपट ठरला. प्रेक्षकांच्‍या आवडीचा अंदाज असूनही चित्रपट दिग्‍दर्शक, निर्माता, कथा लेखकांना आला नाही. त्‍यामुळे एखादी कलाकृती चांगली असते पण ती चित्रपट गृहावर यशस्‍वी बिझनेस करेल याची खात्री कुणीच देवू शकत नाही. त्‍यामुळेच सलग बारा चित्रपट फ्‍लॉप झाल्‍यानंतर, प्रेक्षकांनी नाकारण्‍यात जमा झालेला हिरो नंतर एका चित्रपटानंतर ‘सदी का महानायक’ ठरताे हे सगळे न सुटणारे कोडे आहे.


खरे तर त्‍या काळात विनोद खन्‍ना हा अमिताभ बच्‍चनच्‍या तोडीस तोड उभा राहीला होता. बच्‍चनच्‍या सुपरस्‍टारच्‍या काळात विनोद खन्‍ना सगळ्यात महागडा हिरो होता. ज्‍याला आपण ‘हाइयेस्‍ट पेड ॲक्‍टर’ म्‍हणू शकतो. मग व्‍हिलन आणि मग हिरो असा झाला. उंच पुरा, गोरा, स्‍मार्ट हिरो होता विनोद खन्‍ना. त्‍याची उंची, त्‍याचे पिळदार शरीर आणि ॲक्‍शन सगळच लोकांना भावलं आणि अमिताभ नावाच्‍या वादळात विनोद खन्‍ना खंबीरपणे उभाच राहीला नाही तर त्‍याने ते वादळ शमवले सुद्धा. ही किमया प्रेक्षकांशिवाय शक्‍यच नाही. म्‍हणून सगळे कलाकार प्रेक्षकांनाच मायबाप म्‍हणत असतात. तेच कलाकारांना, त्‍यांच्‍या कलाकृतीला डोक्‍यावर बसवतात आणि त्‍यांच्‍या मनाविरुद्ध झाले तर जमिनीवर पण आदळतात.


सुशांत केस प्रकरणात तुम्‍ही आम्‍ही हे सगळे अनुभवले आहेत. किती जणांचे सोशल मिडिया अकाउंट फॉलोअर्स कमी झाले, कशा टिका झाल्‍या अजूनही सुरूच आहेत. म्‍हणून कलाकारांना अहंकार शोभून दिसत नाही. मोठ मोठ्या स्‍टार्सना घरी बसवले प्रेक्षकांनी.

अमिताभनंतर विनोद खन्‍नाची बॅटिंग सुरू झाली.. आणि तो ओशो रजनिशकडे जाईपर्यंत सुरू होती. पाच वर्षे चित्रपट संन्‍यास घेवून परत आल्‍यावरसुद्धा विनोद खन्‍नाची क्रेझ कमी झाली नव्‍हती. दयावानपासून कितीतरी चित्रपट यशस्‍वी ठरले त्‍याचे. विनोद खन्‍ना, अमिताभनंतर मधला काळ हा साधारण गेला. बरीच मंडळी आपला ठसा उमटवून गेली. पण त्‍यानंतर खरा सुपरस्‍टार झाला नाही.

मग तीन खानचा प्रवास सुरू झाला. शाहरूख खान, सलमान खान, आमीर खान. ही खानावळ अजून सुरू आहे. खान लोकांचा प्रवास सुरू झाला तेव्‍हा भारताची आर्थिक घडी नव्‍या दिशेने सरकू लागली होती. नरसिंहराव यांनी भारतीय अर्थव्‍यवस्‍था खुली करण्‍याचे महत्त्‍वाचे पाऊल उचलले आणि हळूहळू भारतात विदेशी कंपन्‍या, येवू लागल्‍या. मोठ्या प्रमाणात त्‍यांचे प्राॅडक्‍ट बाजारात आले.

विश्‍‍व सौंदर्य स्‍पर्धेत भारताच्‍या सुंदर मुलींना विश्‍‍व सौंदर्याचे अवार्ड मिळायला लागले. आणि सगळा समाज बदलायला लागला. जागतिक मार्केट खुले झाले. जगातल्‍या सगळ्या गोष्‍टी भारतात यायला लागल्‍यात. हॉलीवूडचा प्रभाव वाढला. दूरदर्शन या एकमेव चित्रवाणीची एकाधिकारशाही संपत आली आणि प्रायव्‍हेट चॅनल्‍स सुरू झाले. फॅशन इंडस्‍ट्री जोरात सुरू झाली. कॉस्मॅटिक इंडस्‍ट्री जोरात सुरू झाली. कॉस्मॅटिक इंडस्‍ट्री पण वाढली... आणि या सगळ्या चकाचाँधमध्‍ये चित्रपटाचा चेहरा बदलला. कारण प्रेक्षक बदलला. त्‍यांची नवनवीन परदेशी लोकेशन्‍स बघायची इच्‍छा चित्रपटांनी पुरवली आणि चकाचक चित्रपटांची निर्मिती सुरू झाली.

प्रायव्‍हेट चॅनल्‍सवर सिरीयल्‍सची निर्मिती वाढली आणि या सगळ्यात चित्रपट बदलला. टीव्‍ही सिरीअल्‍समध्‍ये संस्‍कारी वातावरणाच्‍या सिरीअल्‍स आल्‍या. त्‍यानंतर ‘स्‍त्री’ मुख्‍य भूमिकेत असलेल्या टिव्‍ही मालिकांची सुरुवात झाली. टिव्‍हीवर बायकांचेच साम्राज्‍य उभे झाले. मुख्‍य नायिका स्‍त्री आणि निगेटीव्‍ह पात्र पण स्‍त्रीच. पुरुषांना सपोर्टिंग रोल मिळायला लागले.


आणि चित्रपट हिरो केंद्रीत झाले. तसे ते आधीपासूनच होते. पण आता स्वत:च्या खांद्यावर चित्रपटाची धूरा वाहून नेणारा नायक मोठा ठरला. चित्रपटाची धूरा म्हणजे चित्रपटाचा व्‍यवसाय करणारा तो ही करोडो रूपयांमध्ये करून देणारा हिरो मोठा ठरला.

शाहरूख खानचा ‘बादशहा’ झाला. सलमान सामान्य प्रेक्षकांचा हिरो झाला. आमीर सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे सगळ्या प्रेक्षकांच्या आवडीची झाला. तीन खानच्या तीन तऱ्हा चित्रपटाच्या आणि या खानावळीत एक अजून थाळी वेगळी होती. त्यात अक्षय कुमार, अजय देवगण, कपूरस्‌ होते, आजही आहेत. त्यांनी आपला वेगळा मार्ग पत्करला होता आणि त्यात ते यशस्वी झाले.

अक्षय कुमारने तर कितीतरी वेगळ्या भूमिका केल्या. एकेकाळी ॲक्शन हिराे असणारा अक्षय कुमार आज वेगळा विषय घेवून येणार तर म्हणून प्रसिद्ध झालायं. खुल्या बाजारव्‍यवस्थेचे हे परिणाम आहेत. कारण उद्योगव्‍यवसाय वाढले, नोकऱ्या, व्‍यवसाय वाढले, लोकांची आर्थिक परिस्थिती बरी झाली. सिंगल थिएटरचे मल्टीप्लेक्स झाले, दहा रुपयांचे सिनेमाचे तिकीट आता पाचशे रुपयांपर्यंत गेले. तरीही चित्रपट हिट होवू लागले. कारण समाजाची रूची बदलली. वेगवेगळ्या चित्रपट कथा येवू लागल्या. त्यांना तसा तसा प्रेक्षकवर्ग लाभला. कारण सगळे जण एका क्लीकवर आले आहे. त्यामुळे समाजाच्या विचारात फरक पडला. आणि चित्रपट बदलला. पणा अमिताभ नंतर त्यांची जागा घेणारा अजून तरी कुणी दिसत नाही. कारण अमिताभ सर्वांगानी परिपूर्ण आहे.. म्हणून ते महानायक झाले !
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com