esakal | श्री गणेशास अनावृत्त पत्र 
sakal

बोलून बातमी शोधा

श्री गणेशास अनावृत्त पत्र 

टिळकांनी जनतेला एकत्र आनण्यासाठी तुझा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा केला ,पण आज त्याच गणेशोत्वात एकत्र येण्यास आम्हाला बंदी घालण्यात आली आहे.

श्री गणेशास अनावृत्त पत्र 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

श्री गणेशास अनावृत्त पत्र 
प्रिय श्रोगणेशा ,
साष्टांग नमस्कार ,विनंती विशेष ,
पत्रास कारण की --
श्रीगजानना गेले सव्वाशे वर्ष तुझी आम्ही मोठया भक्तिभावाने सेवा करीत आहोत ,तुझ्या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट पहात असतो .तुझ्या स्वागतासाठी तहान -भूक विसरून लहान -थोर मंडळी एक ते दीड महिने अगोदर जय्यत तयारी करीत असतो .आमचे कोणतेही कार्य तुझ्या परवानगी शिवाय सुरू होत नाही ,साध प्रवासाला निघालो तरी तुझ्या जयजयकारा  शिवाय आमची गाडी मार्गस्त होत नाही .पण यंदाच्या वर्षी करोना च्या साथीच्या रोगाने पृथीतलावरील समस्त मानव जातीसमोर मोठे विघ्न उभे केले आहे .तू तर विघ्णहर्ता आहेस .मार्च महिन्यात आम्हास वाटले होते की हे विघ्न तुझ्या आगमनापर्यंत दूर होईल  पण नाहो ,याने तर आमचे जीवनचक्रच थांबवून टाकले आहे .
लोकमान्य टिळकांनी तुझ्या उत्सवाद्वारे नागरिकांना एकत्र करून ब्रिटिश साम्राज्यचा भक्कम  पाया खचवून टाकला ,पण या लहानश्या जिवाने महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेपासून ,हेराखेरीत तरबेज असणाऱ्या चिनी ड्रॅगन ला व विश्वाचे कल्याण चिंतणाऱ्या भारतासारख्या शांतताप्रिय राष्ट्रांना जेरीस आणले आहे .टिळकांनी जनतेला एकत्र आनण्यासाठी तुझा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा केला ,पण आज त्याच गणेशोत्वात एकत्र येण्यास आम्हाला बंदी घालण्यात आली आहे ..सुख -दुःखात एकमेकांना मदत करणे ही आपली संस्कृती ,पण आज शेजाऱ्याकडे मृत्यू झाला तर त्याच्याकडे आम्ही संशयित नजरेने पाहतो ,स्वतःच्या मुलांना आपल्या आई -वडिलांना अखेरचा निरोप देता येत नाही तर विवाह सारख्या मंगल कार्यावर मर्यादा येऊन पडल्या आहेत.


देवा हो देवा ,गणपती देवा ,तुमसे बढकर कौन ?अशी तुझ्या शक्तिसामर्थ्याचा आम्ही गौरव करीत असतो .आज तुझ्या सामर्थ्याची खरी परीक्षा आहे ,तू जर खरंच आम्हा भक्तांचा कैवारी असशील तर या विषाणूचा नायनाट कर व मानवजातीवरील हे संकट दूर कर,हीच तुला पार्थना.

तू बुद्धीची देवता आहेस ,शासन आपल्या स्तरावर प्रचंड प्रयत्न करीत आहे. सर्वसामान्यांचे या रोगापासून रक्षण व्हावे म्हणून अनेक कोविड योद्धे डॉक्टर ,पोलीस ,परिचारिका यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली .परंतु अजूनही आमचे काही बांधव शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करीत नाही त्यामुळे दोवसंदिवस हे संकट गंभीर स्वरूप धारण करीत आहे, अशा आमच्या बांधवाना नियमांचे पालन करण्याची सुबुद्धी दे .


हे देवा आम्ही कधी विचारही केला नव्हता की ,या गतिमान युगात सर्व वाहतूक व्यवस्था ,शिक्षण संस्था ,कार्यालयीन कारभार ,समाजकारण ,राजकारण ,अर्थकारण ,गोरगरिबांची रोजी -रोटी तीन ते चार महिन्यासाठी बंद होऊन जाईल .ठाणबंदीमुळे आमच्या परप्रांतीय व हातावर पोट असणाऱ्या बांधवांची जे हाल झाले ते तर न भूतो न भविष्यती असेच होते .अशाही परिस्थितीत माणुसकीचे अनेक दिवे प्रज्वलित होताना आम्ही पाहिले .अनेक आमच्या  जेष्ठ नागरिकांना  भीतीमुळे प्राण गमवावे लागत आहेत ,तर सर्वसामान्य जनता आजदेखील करोना  नामक भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहे .ही मनमानातील भीती नष्ट होऊ दे व सर्वांना सुखी -संपन्न आयुष्य जगू दे ,हीच सुखकर्त्या गजाननाला विनंती आहे .शिवपुराणात तू अनेक असुरांचा नाश केल्याचा उल्लेख आहे ,तुझी आराधना अशीच अखंड सुरु राहू द्यायची असेल तर करोना रुपी राक्षसाचा तू नायनाट करावा हीच श्रीगणेशा तुला हात जोडून विनंती आहे .

प्रा.डाॅ. दीपक मराठे
सचिव-जागृती मित्र मंडळ भडगाव

loading image
go to top