गुरुवंदना

प्रणिता चंद्रशेखर तेली
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

शिक्षण क्षेत्रात बरेच विद्यार्थी शिक्षकांच्या हाताखालून जातात; पण काही मोजकेच हिऱ्याप्रमाणे चमकतात व स्वतःबरोबर ज्याने घडविले त्या जवाहिऱ्यास पण प्रकाशमान करून टाकतात!

गेल्याच आठवड्यातील ही गोष्ट. दुपारची चारची वेळ. आम्ही सारे शिक्षक आपापल्या वर्गात अध्यापनात दंग होतो. तेवढ्यात शाळेची टेकडी चढून एक सभ्य तरुण शाळेच्या आवारातून ऑफिसात आल. मी अंदाज केला की, बहुधा एखादा अधिकारीच असावा. कार्यालयात येताच काही शब्द कानावर पडले.

‘‘यशवंत चौगले सर आहेत का? मला सरांना भेटायचे आहे.’’ तेवढ्यात सर तेथे आले. त्या व्यक्तीने सरांना वंदन केले. क्षणभर वागण्यात, बोलण्यात व कृतीत नम्रता झळकली, तर डोळ्यांत कृतज्ञता जाणवली. सरांनी आम्हाला त्यांची ओळख करून दिली. हा माझा विद्यार्थी प्रवीण पोवार. कुमार केर्ले शाळेतील हा विद्यार्थी. आज जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर (डाएट) येथे जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण विभागाकडे आहे. सरांच्या विषयीही त्याने अतिशय मार्मिक शब्दात गौरवोद्‌गार काढले.

‘‘सर, तुम्ही येथे आहात म्हणजे येथील कामकाज सारं काही अतिउत्तमच असणार. मी आज एक अधिकारी म्हणून शाळा तपासणीस आलो नाही, तर माझ्या गुरूला भेटायला आलो आहे.’’ वगैरे... शिक्षण क्षेत्रात बरेच विद्यार्थी शिक्षकांच्या हाताखालून जातात; पण काही मोजकेच हिऱ्याप्रमाणे चमकतात व स्वतःबरोबर ज्याने घडविले त्या जवाहिऱ्यास पण प्रकाशमान करून टाकतात!

Web Title: Pranita Teli writes in Muktapeeth