अकाउंट हॅक होण्याची भीती वाटतेय? 'या' आहेत स्मार्ट पासवर्ड तयार करण्याच्या टिप्स अँड ट्रिक्स 

tips to Make your own smart password for social media account Important news
tips to Make your own smart password for social media account Important news

नागपूर : आजकालच्या काळात सोशल मीडियावर अकाउंट नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. शाळेत  जाणाऱ्या मुलांपासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे. प्रत्येकजण निरनिराळ्या प्रकारचे सोशल मीडिया अकाउंट वापरतात. प्रत्येक अकाउंटमध्ये आयडी आणि पासवर्ड महत्वाचा असतो. या दोन गोष्टीमुळे आपण अकाऊंटची गोपनीयता राखू शकतो.

प्रत्येक अकाउंटचा पासवर्ड लक्षात ठेवणं सोपं नाही. त्यात सोपा पासवर्ड ठेवला तर सायबर गुन्हेगारांची त्यावर नजर असण्याची शक्यता असते. अनेकांना अप्लाब सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याची भीती असते.मात्र आता चिंता करू नका. आम्ही तुम्हाला स्मार्ट पासवर्ड ठेवण्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे सायबर गुन्हेगार तुमच्या अकाउंटला हातही लावू शकणार नाहीत. 

या गोष्टी ठेवा लक्षात : 

  • मजबूत, अद्वितीय आणि तरीही सहज लक्षात राहण्याजोगे पासवर्ड तयार करण्यासाठी प्रत्येक पासवर्ड कमीतकमी ८ वर्षाक्षरांचा असला पाहिजे
  • अक्षरे, आकडे आणि चिह्नांचा एकत्रित वापर करा (कीबोर्डवरच्या सर्व कीज् वापरा, कॅपिटल आणि स्मॉल अक्षरांसहित).
  • एखादा पासवर्ड दीर्घकाळाने ओळखू येण्याची शक्यता टाळण्यासाठी ते नियमितपणे बदलत रहा.
  • आपण वापरत असलेली चिह्ने आणि बदललेले शबद् कोणालाही सांगू नका
  • आपले यूझरनेम देखील अपरिचितांना सांगू नका. अर्थात इतरांना आपले यूझरनेम माहीत नसून फक्त पासवर्डच माहीत असेल तर त्यांना त्याचा उपयोग नाहीच.
  • आपल्या आयडी (IDs) अशा प्रकारे बनवा की त्यांमधून आपली ओळख स्पष्ट होणार नाही

असा तयार करा तुमचा स्मार्ट पासवर्ड: 

  • सहज लक्षात राहणारे हे एक वाक्य पहा: "I love my parents and Grand parents" - 'llmpagp' (वाक्यातील प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर घेतले आहे)
  • आता ह्यामधील एकाआड एक अक्षरे कॅपिटल करा - 'LlMpAgP' (हा पासवर्ड आता अधिक सुरक्षित झाला)
  • आता ह्यामध्ये पुढील अक्षरांच्या जागी इतर आकडे किंवा चिह्ने घाला - i=!, g=9, p=&, (ही चिह्ने आपणांस लक्षात ठेवावी लागतील). आता आपला 'L!M&A9&' हा  पासवर्ड अधिकच मजबूत झाला आहे
  • वेगवेगळ्या खात्यांसाठी स्मार्ट पासवर्ड बनवण्यासाठी नेहमीच्या वापरातील शब्दांची रूपे बदला. उदा. shopping - $h0pp!n9 (S =$, i=!, g=9, o=0), Windows -w!nD0W$9, GNULinux - 9NuL!NuX, banking - bank!n99 , Social Network - $0c!alNetw0rK

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com