पोरकटपणा...

yunus tamboli write article in muktapeeth
yunus tamboli write article in muktapeeth

गरीबीत काढलेले दिवस त्यातून मिळालेल्या गोड कटू अनुभवाने आयुष्याला मिळालेली कलाटणी. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी म्हणत जीवन फुलले गेले. मिळालेले वैभव व संपत्ती ही घामातून केलेल्या काबाडकष्टाची आहे. निखाऱ्यावर भाजून गोल आकारात तयार झालेली ही भाकरी खूप रूचकर आहे. तिला कमवाय़ला खूप यातना सहन केलेल्या आहेत. याची जाणीव नव्या पिढीला घडू द्या. सध्याच्या या पिढीसाठी जेष्ठांनी हे प्रबोधन हाती घेण्याची गरज आहे. समाजात आज फुकटच्या भाकरीची किंमत तरूणाईला राहिली नसल्याचेच चित्र आहे.

पितृपंधरवडा होता त्यामुळे मित्राच्या आग्रहा खातर जेवनाला गेलो होतो. घर तसे चांगले सुशोभीत केलेले होते. पत्र्याच्या पडवीत लोंखडी बाज त्यावर सत्तरीत पोहचलले आजोबा बसलेले होते. जुन्या पद्धीतीची कोपरी डोक्यावर फेटा, घोतर असा त्यांचा साधारण पेहराव होता. मित्राने आग्रहाने पुरण पोळीचा बेत केला होता. नमस्कार घालत हात धुतले तशी जेवनवळीला पंगत पडली. भाऊजी... सवकाश जेवा पुरण पोळी गरम गरम होतीया. आता सवकाश पद्धतीने आम्हालाही गरम गरम पोळी मिळू लागली होती. वहिनी सुगरण होती म्हणून पुरण पोळीच काय पण बनविलेला सार भात देखील झकास झाला होता. पुरण पोळीवर गावरान सोडलेली तुपाची धार त्यामुळे तिचा स्वाद वाढला होता. त्यात चुलीवर झालेला स्वयंपाकाच्या स्वादाने घर कसे खमंगतेने भरलेले होते. मित्रा सोबत एकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही दोन अडीच पोळ्या कधी खाल्ल्या कळलच नाही. आता पोराला लय शिकवायच. अधिकारी बनूनच सोडायच. मित्राचे हे बोलणे मात्र सारखे कानावर पडत होते. जेवनाच्या नादात मी त्यावर दुर्लक्ष केल होत. पण त्याचा अट्टहास मला काहितरी विचार करावयाला भाग पाडत होते. अखेर जेवन होऊन आम्ही हात धूऊन शेजारीच असणाऱ्या सोप्यावर बसलो.

ह....आता बोल. कुठ आहे तुझा मुलगा. कितीवीला आहे तो. अभ्यास करतो की नाही. असे पटापट प्रश्न विचारू लागलो. तेवढ्यात सत्तरीतले आजोबांनी माझ्याकडे नजर रोखली. मित्राने मुलाला माझ्यासमोर बसविले. नाव, शाळा सांगून सातवीला असल्याचे त्याने सांगितले. मग काय पुढ अधिकारी बनायच. असे तुझे बाबा म्हणतात. होणार का तू अधिकारी मी आपल सहजच बोलत होतो. मुलाने देखील खुप छान उत्तरे देण्यास सुरूवात केली होती. तेवढ्यात त्या मुलाला मी विचारले, बाळा तुझ्या आजोबांना किती जमीन आहे. दोन एकर. त्याने पटकन उत्तर दिले. ठिक आहे. मग आजोबांना किती मुले, वडील अन चुलते अशी दोन मुले. आता त्यांच्यात वाटणी झाल्यावर त्यांना किती मिळाली. एक एकर प्रत्येकी. अगदी बरोबर. गणीत अगदी पक्क आहे तुझ म्हणत त्याला शाब्बासकी दिली. आता तुझ्या बाबांना तुम्ही किती मुल. यावर धाकट्या भावाचे नाव सांगत आम्ही दोघे भाऊ असल्याचे त्याने सांगितले. मग तुम्हाला किती जमीन वाट्याला शिल्लक राहिल. अर्धा एकर. वा छान म्हणत मी त्याला प्रोत्साहन देत होतो. तु मोठा झाल्यावर तुलाही दोन मुल होतील अस समजू. त्यावेळी तुझ्या मुलांकडे किती शिल्लक राहिल. पाव एकर. मग तू अधिकारी झाल्यावर कमविलेली जमीन कुठ आहे. असे म्हटल्यावर सत्तरीतले आजोबा देखील बोलू लागले. अरे माझ्या मुलांनी माझ्याच जमीनवर संसार उभा केला. त्यांना त्यात वाढ करून नव्याने घेता आली नाही. तु देखील अधिकारी झाल्यावर माझ्याच जमीनीवर प्रपंच थाटणार का ? काही सुधारणा  करणार की नाही. तव्यावर पाणी पडावे तसे काहितरी चिर्र...चिर्रययय. असा आवाज आतून येऊ लागला होता. मी मात्र मुलाला अधिकारी बनविण्यासाठी आग्रह धरणाऱ्या मित्राला संदेश दिला. अरे आयुष्य तर सगळेच जगतात. अधिकारी काय अन सर्व सामान्य माणूस काय ? आजोबांनी दिलेला एकच संदेश किती महत्वाचा आहे. जे मिळालय त्यात वाढ करायला शिकव. पोरकटपणा करू नकोस फुकटच्या मिळालेल्या भाकरीची किंमत तरूणाईला राहणार नाही. कारण त्यांना त्या कष्टाची जाणीव राहणार नाही.
 
अन... आजोबा पुढची पिढी घडवायची असेल तर तुमच्या अनुभवाचा खजीना शिकवा. फुकटच्या सवयी लावू नका. तुमच्या घामाच्या काबाडकष्ट केलेल्या शरीराने किती झिज घेतली यांना कळू द्या. त्यांनाही काबाडकष्ट करण्याची जिद्द पेटवा. नाहीतर आजोबाने मुलाच्या अन मुलाने मुलांच्या नावावर जमीनी करून जेष्ठ वृद्धाश्रमात असल्याच्या अनेक घटना समाजात आहेत. असे सांगूनच मित्राचा निरोप घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com