कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठीची नोंदणी पुर्ण; 4 कोटी डोस तयार

मिलिंद तांबे
Monday, 14 December 2020

पुण्यातील सीरम इंन्स्टिट्यूटच्या प्रयोगशाळेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या मदतीने लस निर्मितीचे काम सध्या सुरू आहे.

मुंबई, ता. 14 : कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठीची नोंदणी पुर्ण झाली असून लवकरच ही लस उपलब्ध होणार आहे. याशिवाय US कडून विकसित करण्यात आलेल्या कोव्हॅक्स या लसीसाठी आवश्यक चाचण्या देखील करण्यात येणार असून त्यासाठीचा आवश्यक करार देखील ICMR, सीरम आणि नोवाव्हॅक्स कंपनी दररम्यान झाला असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय परिषदेने दिली.   

कोव्हिशिल्डच्या चाचणीसाठी येणारा खर्च ICMRने केला आहे तर कोव्हिशिल्ड लस तयार करण्यासाठी येणारा खर्च हा सीरम संस्थेने केला आहे. ICMR आणि सीरमने देशभरातील 15 केंद्रांवर कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या आणि तिस-या टप्प्यातील चाचण्या सुरू केल्या आहेत. यासाठी आवश्यक असणाऱ्या 1600 स्वयंसेवकांची नोंदणी 31 ऑक्टोबरपूर्वी करण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी: मंत्र्यांच्या बंगल्यांनी थकवले महापालिकेचे २४ लाख ५६ हजार; मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा' देखील डिफॉल्टर

पुण्यातील सीरम इंन्स्टिट्यूटच्या प्रयोगशाळेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या मदतीने लस निर्मितीचे काम सध्या सुरू आहे. तर UK मध्ये निर्णाण झालेल्या लसीची चाचणी युके, ब्राझिल, साऊथ अफ्रिका, युएसएमध्ये सुरू असल्याची माहितीही आयसीएमआर ने दिली.

कोव्हिशिल्डच्या आतापर्यंतच्या चाचण्यांचा अहवाल सकारात्मक असल्याने देशभरातील शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास वाढला आहे. मानवी चाचणी करण्यात येणारी कोव्हिशिल्ड ही सर्वात अत्याधुनिक चाचणी असल्याचेही आयसीएमआर ने म्हटले आहे. कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या आणि आणि तिसऱ्या टप्प्यातील सकारात्मक अहवाल पाहता लस लवकरच उपलब्ध होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.  डिसीजीआयच्या मान्यतेने सीरम ने आतापर्यंत 4 कोटी लस तयार केल्या असल्याची माहिती ही आयसीएमआर ने दिली.

UK ने निर्माण केलेल्या नोव्हॅक्स लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा सध्या साऊथ अफ्रिका, युके आणि अमेरिकेत सुरू आहे. सीरमने मोठ्या प्रमाणात या लसीदेखील खरेदी केल्या असून कोव्हॅक्स नावाने या लसीची चाचणी देखील तिसऱ्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक परवानग्यांसाठी संबंधित विभागाकडे आयसीएमआर आणि सीरमने अर्ज केला असल्याची माहितीही आयसीएमआर ने दिली.  

महत्त्वाची बातमी:  पाकिस्तानी क्रेडिट कार्ड प्रकरणानंतर प्रताप सरनाईकांनी कंगनाविरोधात आणि बदनामी करणाऱ्या माध्यमांविरोधात दाखल केला हक्कभंग

सर्व देशभर पसरलेला साथीचा आजार सार्वजनिक आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांच्या उभारणेत सुधारणेची संधी देणारा आहे. आयसीएमआर सोबतची ही भागीदारी खासगी सार्वजनिक संस्था व्यवस्थापन एकत्रित करण्यात आणि कोरोनासारख्या साथीचा बंदोबस्त करण्यासाठी एकत्र येण्याचे महत्व अधोरेखीत केले आहे. यात आयसीएमआरची महत्वाची भूमिका असल्याचे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी सांगितले.

कोरोना लस निर्मिती आणि उत्पादन यात भारताने महत्वाची भूमिका बजावली आहे. आयसीएमआर ने सीरम इन्स्टिट्यूट सोबत भागीदारी केल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुसज्ज यंत्रणा उभी करता आली. यामुळे कोव्हीशिल्ड आणि कोव्हक्ससारख्या लस निर्मितीत महत्वाची भूमिका बजावता आल्याचे आयसीएमआर चे संचालक डॉ बलराम भार्गव यांनी सांगितले.

मुंबई आणि उपनगरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

registration process completed for the third phase clinical trial of Covishield


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: registration process completed for the third phase clinical trial of Covishield