मुंबईः गणपती विसर्जनासाठी पोलिस सज्ज

अनिश पाटील
Monday, 4 September 2017

मुंबई: गणपती विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सगळ्या पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, बंदोबस्तासाठी सर्वच म्हणजे सुमारे 43 हजारांचा फोर्स तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय महत्त्वाच्या चौपाट्यांवर क्यूआरटीचे पथक, बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात येणार आहे. तसेच चौपाट्यांवर ड्रोन व दुर्बिणधारी पोलिस लक्ष ठेऊन राहणार आहेत. यासाठी वॉट टॉवरही उभारण्यात आले आहेत.

मुंबई: गणपती विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सगळ्या पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, बंदोबस्तासाठी सर्वच म्हणजे सुमारे 43 हजारांचा फोर्स तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय महत्त्वाच्या चौपाट्यांवर क्यूआरटीचे पथक, बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात येणार आहे. तसेच चौपाट्यांवर ड्रोन व दुर्बिणधारी पोलिस लक्ष ठेऊन राहणार आहेत. यासाठी वॉट टॉवरही उभारण्यात आले आहेत.

गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, दादर चौपाटी, शीतल तलाव, चरई तलाव, आरे तलाव, नॅशनल पार्क तलाव, मार्वे बीच, पवई तलाव, माहीम चौपाटी, वर्सोवा, शिवाजी तलाव यासह सुमारे 119 ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यावेळी मुंबई पोलिसांसह  राज्य राखीव पोलीस बल, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, होम गार्ड यांच्यासह नागरी सुरक्षा दलाचे 1200 जवानांचे पथक तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय स्वयंसेवी संस्थांचेही सुमारे हजार स्वयंसेवक पोलिसांना मदत करणार आहेत. मुंबईवर असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता विसर्जन स्थळी वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. शहरातील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच कोंबिंग ऑपरेशन देखील राबविण्यात आले. याशिवाय विसर्जन काळात नौदलाचे हेलिकॉप्टरही चौपाट्यांवर गस्त घालणार आहे. तसेच जीव रक्षक, स्थानिक मच्छीमारांचीही मदत घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाहतुकीसाठी विशेष सुविधा
महत्त्वाच्या चौपाट्यांवर स्टील प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. गिरगाव चौपाटीसाठी व्हीपी रोड, भडकमकर मार्ग, के शंकर शेट रोड, नाना चौक येथून गणेशमुर्ती जातील. ऑपेराहाऊस सिग्नल पुढे इतर वाहनांना बंदी करण्यात येणार आहे. दादर चौपाटीवर एनसी केळकर, वरळी व माहिम येथून मिरवणूका येतील, तर जुहू चौपाटीवर जुहू तारा रोड व विलेपार्ले येथून गणेशमुर्ती चौपाटीवर येतील. लालबागच्या राजासाठीही विशेष वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे.  वाहतुकीची व्यवस्था हाताळायला 3600 वाहतूक पोलीस, त्यांच्या जोडीला 500 ट्रॅफिक वॉर्डन असतील. यंदा मुंबईतील महत्त्वाची मंडळे आणि संवेदनशील ठिकाणी विशेष सुरक्षा देण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत. लालबागच्या राजाला दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील विशेष सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली असून प्रमुख चौपाट्यांवर विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहेत. ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संपूर्ण मुंबईवर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच प्रमुख चौपाट्यांवर विशेष सीसीटीव्ही व्हॅनही तैनात करण्यात येणार आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सरकारी थकबाकीदार सत्यपाल सिंह मंत्रिमंडळात 
दुर्दैवी अनिता अन्‌ तमीळ अस्मिता...!
धुळे जिल्ह्यात 351 वर्गखोल्या धोकादायक
एकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू
मानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन
भाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले
'व्हेंटिलेटर' आणि 'हाफ तिकीट' सर्वोत्कृष्ट चित्रपट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news ganesh festival 2017 and police security