esakal | गणरायाचे ऑनलाईन जागरण!; जागरणासाठी होतोय समाज माध्यमांचा वापर
sakal

बोलून बातमी शोधा

गणरायाचे ऑनलाईन जागरण

विघ्नहर्ता गणेशाचे आगमन होऊन पाच दिवस झाले आहे. दर वर्षीप्रमाणे उत्साहात भक्तिमय वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना झाली. गणेशोत्सवाला एकत्रित जागरणाची परंपरा आहे. यावर्षी कोरोनामुळे सामाजिक दुरी पाळत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात एकत्रित जागरणाची परंपरा खंडित झाली आहे. मात्र, रात्री होणाऱ्या जागरणाला खंड पडू नये, भक्तांनी आधुनिक समाज माध्यमातून गणरायाच्या जागरणाला सुरुवात केली आहे. 

गणरायाचे ऑनलाईन जागरण!; जागरणासाठी होतोय समाज माध्यमांचा वापर

sakal_logo
By
अजित शेडगे

माणगाव : विघ्नहर्ता गणेशाचे आगमन होऊन पाच दिवस झाले आहे. दर वर्षीप्रमाणे उत्साहात भक्तिमय वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना झाली. गणेशोत्सवाला एकत्रित जागरणाची परंपरा आहे. यावर्षी कोरोनामुळे सामाजिक दुरी पाळत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात एकत्रित जागरणाची परंपरा खंडित झाली आहे. मात्र, रात्री होणाऱ्या जागरणाला खंड पडू नये, भक्तांनी आधुनिक समाज माध्यमातून गणरायाच्या जागरणाला सुरुवात केली आहे. 

मोठी बातमी : राज्य सरकारचा मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय; घर खरेदीदारांना दिलासा

गौरी-गणपती उत्सवात जागरणाची मोठी परंपरा आहे. गाव शहरातील आप्त नातेवाईक, मित्र परिवार एकमेकांच्या घरी जाऊन भजन, गाणी, नृत्य, एकत्रित खेळ करतात. या जागरणात खूप मोठी धम्माल असून आठवणीतील जागरणाची परंपरा असते. यावर्षी मात्र कोरोनामुळे सामाजिक दुरी राखणे महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे अनेक चाकरमानी शहरात आणि इतरत्र असल्याने त्यांना जागरणाचा आनंद घेता येत नाही. त्यांच्यामध्ये यामुळे काहीशी नाराजी होती; मात्र आधुनिक समाज माध्यमे या नवतरुणांच्या मदतीला आले आहे. अनेक जण याच समाज माध्यमांचा वापर करत गाणी, कविता, खेळ, गप्पा आदी कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने करत आहेत. यासाठी व्हॉट्‌सऍपवरून व्हिडीओ कॉल, झूम मीटिंग, रेकॉर्डिंग आदी सुविधांचा वापर करत कोरोना साथीतही गणरायाच्या जागरणाची रंगत वाढत आहे. 

अधिक वाचा : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण! अमली पदार्थ विरोधी पथकाने दाखल केला गुन्हा

दरवर्षी जागरणाला मोठी धम्माल असायची. यावर्षी कोरोनामुळे गावी येता आले नाही. मात्र, जागरणात होणारे भजन, गाणी आम्ही रेकॉर्डिंग करून समाज माध्यमातून जागरण करत आहोत. लांब असलो तरी जागरणाचा आनंद घेत आहोत. 
- दत्ताराम मोंडे, गणेशभक्त 

कोरोना संकटात सामाजिक दुरी पाळत आहोत. समाज माध्यमांचा वापर करून व्हिडीओ कॉलवर गप्पा, ऑनलाईन आरतीचा आनंद घेत आहोत. 
- शैला खडतर, गृहिणी 

हेही वाचा : कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी जीवक रोबोट दाखल; डॉक्टरांचाही धोका होणार कमी

मुंबई

(संपादन : उमा शिंदे)