esakal | कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी जीवक रोबोट दाखल; डॉक्टरांचाही धोका होणार कमी
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी जीवक रोबोट दाखल; डॉक्टरांचाही धोका होणार कमी

मध्य रेल्वे मार्गावरील परळ कार्यशाळेत तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक रोबोट 'जीवक' भायखळा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल हाॅस्पिटलमध्ये दाखल झाला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी जीवक रोबोट दाखल; डॉक्टरांचाही धोका होणार कमी

sakal_logo
By
प्रशांत कांबळेमुंबई ः  मध्य रेल्वे मार्गावरील परळ कार्यशाळेत तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक रोबोट 'जीवक' भायखळा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल हाॅस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. रुग्णांना तपासण्यास जीवकची डाॅक्टरांना मदत होणार आहे. त्यामुळे डाॅक्टरांचाही धोका कमी होणार आहे.  मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी नुकतेच त्याचे उद्घाटन केले आहे. 

लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट चालक खचले; अनेकांना मानसोपचाराची गरज; पैशांसाठी देणेकरांचा तगादा

कोव्हिड योद्ध्यांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेने पुढाकार घेतला असून आतापर्यंत त्यांच्यासाठी  मुखपट्ट्या, पीपीई कव्हरेल्स, सॅनिटायझर, ऑक्सिजन ट्रॉलीची निर्मिती केली आहे. तसेच रेल्वे डब्ब्यांना कोव्हिड विलगीकरण डब्ब्यांमध्ये रूपांतरित केले आहे. त्याचअंतर्गत ड्रोनस्टार्क आणि बीजीएन मेडटेक्स (इंडिया)यांच्या सहकार्याने परळ कार्यशाळेने 'जीवक' या मेडी-बोटची संकल्पना आखून रोबोटचीसुद्धा निर्मिती केली आहे. 

आईसक्रीमच्या एका पॅकमुळे रेस्टॉरंट मालकाला भरावाच लागणार दोन लाखांचा दंड, वाचा नक्की काय झालेलं

जीवकची विशेषता
जीवकच्या माध्यमातून डॉक्टर आपल्या केबिनमधूनच रूग्णाशी बोलू शकतो आणि पडद्यावर रुग्ण पाहून व्हर्च्युअल तपासणी करु शकतो. त्यासाठी जीवक रुग्णाचे तपमान, रक्तदाब, हृदय गती आणि ऑक्सिजन पातळीची तपासणीही करू शकणार आहे. तसेच, जीवककडे औषधाची पेटीदेखील असणार आहे. त्यातून रुग्णाला नियमित औषधे देता येतील.

-------------------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image