esakal | सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण! अंमली पदार्थ विरोधी पथकाने दाखल केला गुन्हा 
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण! अंमली पदार्थ विरोधी पथकाने दाखल केला गुन्हा 

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सीबीआय पथकाने सलग सहाव्या दिवशी सुशांतचा मित्र  सिध्दार्थ पीठानी  याची कसून चौकशी केली आहे. कलीना भागातील  डीआरडीओच्या विश्रामगृहात ही चौकशी करण्यात आली. 

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण! अंमली पदार्थ विरोधी पथकाने दाखल केला गुन्हा 

sakal_logo
By
विनोद राऊत

मुंबई ; सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सीबीआय पथकाने सलग सहाव्या दिवशी सुशांतचा मित्र  सिध्दार्थ पीठानी  याची कसून चौकशी केली आहे. कलीना भागातील  डीआरडीओच्या विश्रामगृहात ही चौकशी करण्यात आली. 

शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्याच्या वैद्यकीय अहवाल प्रती कुटूंबियांना द्या;उच्च न्यायालयाचे निर्देश

14 जुलैला सुशांत सिंह याने गळफास घेऊन आत्महत्या केली, त्या दिवशी सिध्दार्थ पिठानी, सुशांतचा आचारी निरज सिंह, मदतनीस दिपेश सावंत हे सुशांतच्या फ्लँटमध्ये उपस्थित होते. दरम्यान डीआरडीओ विश्रामगृहात वांद्रे पोलिसांचे पथकही आले होते. यामध्ये महिला पोलिस आणि एक सहायकाचा समावेश होता. एक तासानंतर पोलिस पथक निघून गेल्याची माहिती आहे. सिध्दार्थसोबत बिल्डींगचा सुरक्षा रक्षक, वॉटर स्टोन हॉटेलच्या मॅनेजरची चौकशी सीबीआयने केली आहे. 

दरम्यान सीबीआयच्या एका पथकाने कूपर रुग्णालयात भेट दिली. सुशांत सिंहच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयात करण्यात आले होते. पोस्टमार्टेमसंदर्भातही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. पोस्टमार्टेम रुममध्ये रिया चक्रवर्तीला थेट जाण्याची परवानगी कशी दिली याबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे सिबीआय पथकाने तेथील डॉक्टरांची चौकशी केल्याची माहिती आहे. 

मोठी बातमी! राज्य सरकारचा मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय; घर खरेदीदारांना दिलासा

अंमली पदार्थ विरोधी पथकाने दाखल केला गुन्हा 
सुशांत सिंह प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी ब्युरोने 28, 20 बी या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केला असून, या प्रकरणी पुढील चौकशी करणार आहे. ईडीच्या चौकशी दरम्यान रिया चक्रवर्तीच्या ड्रग कनेक्शन आणि अंमली पदार्थ सेवनासंदर्भात काही माहिती समोर आली होती. या माहितीच्या आधारे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

------------------------------------------

loading image