स्थानिक ठेकेदारांचा जेएसडब्ल्यूचा गेट बंदचा इशारा; आमदार रवीशेठ पाटील, महेंद्र दळवी यांचा पाठिंबा

वडखळ : धायरेश्वर कॉन्ट्रॅक्‍टर असोसिएशन इस्पात डोलवी या युनियनच्या आंदोलनाला आमदार रवीशेठ पाटील, महेंद्र दळवी यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
वडखळ : धायरेश्वर कॉन्ट्रॅक्‍टर असोसिएशन इस्पात डोलवी या युनियनच्या आंदोलनाला आमदार रवीशेठ पाटील, महेंद्र दळवी यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
Updated on

वडखळ : पेण तालुक्‍यातील जेएसडब्ल्यू इस्पात कंपनीमध्ये डोलवी, वडखळ, गडब या ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास 110 स्थानिक ठेकेदार 15 ते 20 वर्षांपासून काम करत आहेत. मात्र, आजमितीला पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असूनही कंपनी या ठेकेदारांना दर वाढवून देत नसल्याने; तसेच स्थानिकांना डावलून बाहेरील ठेकेदारांना प्राधान्य देत असल्याने या भागातील धायरेश्वर कॉन्ट्रॅक्‍टर असोसिएशन इस्पात डोलवी या युनियनने येत्या सोमवारी जेएसडब्ल्यू कंपनीचे दोन्ही गेट बंद करण्याचा इशारा दिला आहे. युनियनच्या या निर्णयाला आमदार रवीशेठ पाटील, महेंद्र दळवी यांनी पाठिंबा दिला आहे.

जेएसडब्ल्यू कंपनीतील ठेकेदारांना दर वाढवून मिळावा, स्थानिकांना ठेका मिळावा, कंपनी परिसरात कामगारांसाठी बांधलेल्या कॉलनीमध्ये स्वच्छता ठेवावी, येथील कोरोना रुग्णांचा खर्च कंपनीने करावा, बाहेरून येणाऱ्या कामगारांना क्‍वारंटाईन करावे. स्थानिक ठेकेदारांना कमी दर देयाचा व बाहेरील ठेकेदारांना जास्त दर दिला जातोय ते थांबायला पाहिजे. स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे आदी मागण्यांसाठी जेएसडब्ल्यू कंपनीचे गेट रोखून आंदोलन करणार असल्याचे युनियनचे अध्यक्ष संजय जांभळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी उपाध्यक्ष प्रभाकर म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, सचिव मधुकर पाटील, वडखळ सरपंच राजेश मोकल, गडब ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तुलशीदास कोठेकर, अनिल म्हात्रे आदींसह युनियनचे सदस्य उपस्थित होते. 

आमदारांचा पाठिंबा 
पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवीशेठ पाटील यांनी सोमवारी होणाऱ्या गेटबंद आंदोलनाला पाठिंबा देत, वेळ आली तर तालुक्‍यातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून स्थानिकांना कंपनीत सामावून घेण्याची मागणी करू, असे सांगितले. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही युनियनला पाठिंबा दर्शवून आपण सर्व स्थानिक आहोत, आपल्याला नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. त्यासाठी जो निर्णय घ्याल, त्यासाठी मी तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले. 

(संपादन : उमा शिंदे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Adani, Reliance, NTPC MoUs Signed; Konkan Nuclear Project Site Not Finalised
Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
Marathi News Esakal
www.esakal.com