कोरोनामुळे स्वातंत्र्यदिनानिमित्त होणा-या खरेदीवर परिणाम;  बाजारपेठा सजल्या; खरेदीला मात्र आखडता हात

शरद वागदरे
Thursday, 13 August 2020

स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या आहेत. पालिका क्षेत्रातील सिग्नल, एपीएमसी मार्केट, पालिकेच्या आठही नोडमधील दुकानांमध्ये झेंडे, टी-शर्ट, दुपट्टा, कुर्ती, खादीचे कपडे विक्रीसाठी आले आहेत; मात्र कोरोना आणि वाढलेली महागाईचा परिणाम यंदाच्या खरेदीवर दिसत आहे.

वाशी : स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या आहेत. पालिका क्षेत्रातील सिग्नल, एपीएमसी मार्केट, पालिकेच्या आठही नोडमधील दुकानांमध्ये झेंडे, टी-शर्ट, दुपट्टा, कुर्ती, खादीचे कपडे विक्रीसाठी आले आहेत; मात्र कोरोना आणि वाढलेली महागाईचा परिणाम यंदाच्या खरेदीवर दिसत आहे. झेंडे आणि खादीचे कापड यांच्या मागणीतही घट झाल्याचे दुकानदारांनी सांगितले. मागील वर्षी असणाऱ्या दरांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. या वर्षी कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने त्याचा फटका विक्रेत्यांना बसला आहे. 

अरे वाह... : कळंबोली पोलिस मुख्यालयात पाळणा हलला

पुन्हा कागदी झेंडे दाखल 
काही वर्षांपूर्वी कागदांचे झेंडे विक्रीस उपलब्ध नव्हते; मात्र प्लास्टिकवर बंदी असल्याने कागदी झेंडे पुन्हा बाजारात दाखल झाल्याचे निदर्शनास येत आहे. दुकानदारांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नवीन माल विक्रीसाठी आणला नाही. 

मोठी बातमी : अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची शक्यता 

झेंड्यासह खादीचे कपडे, वुलनचे जॅकेट, खादीची टोपी यांनी बाजारपेठ सजली आहे; मात्र मागील वर्षाच्या तुलनेत निम्मा मालही विक्री झाला नाही. 26 जानेवारीच्या वेळी दुकानांमध्ये शिल्लक राहिलेलाच माल पुन्हा विक्रीसाठी ठेवला आहे. 
- कांतीलाल जैन, दुकानदार 

शाळा, महाविद्यालयातील मुले मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यदिनासाठी टी शर्ट, कुर्ती, मुली तिरंग्याच्या कलरचा दुपट्टा खरेदी करत; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे विक्रीला फटका बसला आहे. स्वातंत्र्यदिनासाठी लागणारे झेंडे विक्रीसाठी बाजार सजला आहे; मात्र खरेदीसाठी नागरिक पुढे येत नाहीत. 
- हरीश पांडेय, विक्रेते 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not interested people to purchase of trending things on occassion of Independend day