esakal | किनारपट्टीवर नौकांचा मुक्काम वाढणार; अवकाळी पावसाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

अलिबाग : हवामान बदलामुळे मच्छीमारी नौका सध्या बंदरात मुक्काम करून आहेत.

परतीचा पाऊस लांबण्याचा अंदाज हवामान विभागाने दिल्याने येथील शेतकरी, मच्छीमारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सध्या भातकापणीचे काम जोरात सुरू आहे. अशा स्थितीत मुसळधार पाऊस पडल्यास कापलेले पीकही खराब होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर खराब हवामानामुळे मासेमारी नौका बंदरातच नांगरून ठेवल्या आहेत. बुधवारपर्यंत (ता. २१) कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याच्या शक्‍यतेने नौकांना बंदरातील मुक्काम वाढवावा लागणार आहे.

किनारपट्टीवर नौकांचा मुक्काम वाढणार; अवकाळी पावसाचा इशारा

sakal_logo
By
महेंद्र दुसार

अलिबाग : परतीचा पाऊस लांबण्याचा अंदाज हवामान विभागाने दिल्याने येथील शेतकरी, मच्छीमारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सध्या भातकापणीचे काम जोरात सुरू आहे. अशा स्थितीत मुसळधार पाऊस पडल्यास कापलेले पीकही खराब होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर खराब हवामानामुळे मासेमारी नौका बंदरातच नांगरून ठेवल्या आहेत. बुधवारपर्यंत (ता. २१) कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याच्या शक्‍यतेने नौकांना बंदरातील मुक्काम वाढवावा लागणार आहे.

अवकाळी पावसाचा परिणाम शेतकरी, मच्छीमार यांच्यासह वीटभट्टी कामगार यांच्यासह या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना बसला आहे. हे सर्वजण पाऊस जाण्याची वाट पाहत आहेत. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे.परंतु, आजपासून हवामानात पुन्हा बदल होत असल्याने मच्छीमारांनी जवळच्या बंदरांचा आधार घेणे पसंत केले आहे.

महत्त्वाची बातमी : कांदा रडवतोय! किरकोळ बाजारात १०० रुपये किलो

जीवनाबंदर, दिवेआगर, दिघी या बंदरात रत्नागिरी जिल्ह्यातील नौकांनी आधार घेतला आहे, तर मुंबई, पालघर येथील काही मच्छीमारांनी करंजा, मांडवा, वरसोली बंदरात नौका आणल्या आहेत. तर रायगड जिल्ह्यातील मच्छीमारही इतर बंदरांमध्ये थांबले आहेत. हवामान शांत होईपर्यंत या नौका येथेच मुक्काम करणार आहेत. दरम्यान, कोरोनामध्ये थांबलेली अर्थव्यवस्था सुरळीत होत असतानाच पावसाने आर्थिक संकट वाढवल्याचे म्हणणे येथील शेतकऱ्यांचे आहे.

मोठी बातमी : इंडिनेशियन तरुणीने पुणेकर मित्राला गंडवले; खोट्या लोकशनद्वारे मित्राची फसवणूक 

शेतकऱ्यांची चिंता वाढली
रायगड जिल्ह्यातील डोंगराळ भागात भातकापणीला वेग येत असतानाच पडणाऱ्या पावसामुळे पीक भिजले. भरडाईला भिजलेले धान्य उतरणार नसल्याने त्यास योग्य भाव मिळणार नाही, अशी भीती शेतकरी आतापासूनच व्यक्त करू लागले आहे. दिवसभर असणारे ढगाळ वातावरण आणि अचानक पडणाऱ्या पावसात कापलेला भात कुठे ठेवायचा, असा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे. पाऊस आणि उधाणामुळे खाडीलगतच्या खलाटीतील भातपिकाचीही नासधूस होत आहे.

हेही वाचा : रायगडमधील बेकायदा मद्यविक्रीचे नव्या पोलिस अधीक्षकांसमोर आव्हान; कोट्यवधीची उलाढाल असल्याची शक्यता 

भारतीय हवामान विभागाने दिलेला इशारा संदेश सर्व यंत्रणांना दिला आहे. मंगळवारपासून विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर जास्त असणार असून, तो बुधवारी रात्रीपर्यंत राहणार आहे. गुरुवारी वातावरण पूर्ववत होऊ शकते.
- सागर पाठक,  आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड

(संपादन : उमा शिंदे)