'याचा अर्थ सर्वसामान्य मतदारांनी लक्षात घ्यायला हवा'; मनसेबद्दल संजय मोनेंची पोस्ट

'याचा अर्थ सर्वसामान्य मतदारांनी लक्षात घ्यायला हवा'; मनसेबद्दल संजय मोनेंची पोस्ट

मुंबई:  कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीत राजकीय उलथापालथ होण्यास सुरुवात झाली आहे. मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. तर मंगळवारी सकाळी मनसेचे नगरसेवक आणि माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात असतानाच आता प्रसिद्ध अभिनेते संजय मोने यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राज ठाकरे आणि मनसे पक्षाची बाजू उचलून धरली आहे.

संजय मोनेंची फेसबुक पोस्ट

'ज्या पक्षाचा फक्त एक आमदार आहे, त्या पक्षाच्या कुठल्याही पातळीवरच्या नेत्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश केला की लगेच "मोठी बातमी" असा मथळा देऊन बातमी लिहिली किंवा बोलली जाते. याचा अर्थ त्या पक्षाच्या "असण्याची" सगळे जण दखल घेतात. हो ना? याचा अर्थ सर्वसामान्य मतदारांनी लक्षात घ्यायला हवा. या मधल्या लॉकडाउनच्या काळात सत्ता हाताशी नसताना ज्यांनी तुम्हाला मदत (साहाय्य खरं तर)केली, ते जरा लक्षात ठेवा. माझ्या मतदार संघात, जो स्वतः राज ठाकरे यांचाही आहे, नितीन सरदेसाई यांनी जे काही कष्ट केले त्यांना आणि त्यांच्या सहका-यांना त्याची पावती देणं हे आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य म्हटलं की उगाच जबाबदारी येते. तर थोडा शब्दप्रयोग बदलतो, तर आपला हक्क आहे असं समजा.

तळटीप- मी कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाहीये. फक्त परिस्थिती आणि अवस्था काय होती ते सांगतोय. इतर अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आणि अवस्था होती. शेवटी आपण ठरवायचं आहे. जाणता राजा (जो जाणतो) आणि नेणता राजा (जो आपल्याला हव्या त्या ठिकाणी -इप्सित स्थळी सुरक्षित नेतो) यात निवड करायची आहे. बोटाला रंग लागला की मतदान असं समजू नका, रंग लावायला बोट शिल्लक राहिलंय हे महत्वाचं.

अभिनेते संजय मोने हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. मनसेसाठी त्यांनी लिहिलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

marathi actor sanjay mone facebook post on mns leaders

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com