महत्वाची बातमी : मुंबई-पुणे दरम्यान पॅसेजर ट्रेन बंद

महत्वाची बातमी : मुंबई-पुणे दरम्यान पॅसेजर ट्रेन बंद

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावरील मंकी हिल ते कर्जतदरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेवरील काही किरकोळ कामांमुळे पॅसेंजर गाड्या १५ जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये सीएसएमटी ते पंढरपूर, पनवेल ते पुणे यासह अन्य पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे. त्याशिवाय कोयना एक्‍स्प्रेस पुण्याहून सोडण्यात येणार आहे.

जीएसटीच्या परताव्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आक्रमक

बोरघाटातील मंकी हिल ते कर्जतदरम्यानच्या रेल्वेरुळांचे पावसामुळे नुकसान झाले होते. त्यामुळे बोरघाटातील तिसऱ्या मार्गिकेवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करून एक्‍स्प्रेस अन्य मार्गावरून वळवण्यात आली होती. पुलाचा विस्तार यासह काही महत्त्वाची कामे पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या मार्गिकेवरील रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली; मात्र काही किरकोळ कामे अद्यापही बाकी आहेत. या कामांसाठी मंकी हिल ते कर्जतदरम्यान एक्‍स्प्रेस-पॅसेंजर गाड्यांसाठी प्रतितास २० किलोमीटरची वेगमर्यादाही आखली आहे. ही कामे लवकर पूर्ण करण्यासाठी पॅसेंजर गाड्या १५ जानेवारीपर्यंत रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे १५ जानेवारीपर्यंत भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेस मनमाड-दौंडमार्गे वळवण्यात आली असून कोल्हापूर ते सीएसएमटी कोयना एक्‍स्प्रेस पुण्यापर्यंत धावणार असून पुण्याहूनच कोल्हापूरसाठी सुटणार आहे.

रद्द केलेल्या गाड्या         कधीपर्यंत रद्द         कधीपर्यंत रद्द
पनवेल - पुणे पॅसेंजर            १५ जानेवारी  
सीएसएमटी - पंढरपूर पॅसेंजर     २ ते ४ जानेवारी,       ९ ते ११ जानेवारी
पंढरपूर - सीएसएमटी पॅसेंजर     ३ ते ५ जानेवारी   १२ जानेवारी
सीएसएमटी ते बिजापूर पॅसेंजर     ५ ते ८   १२ ते १५
बिजापूर ते सीएसएमटी पॅसेंजर     ६ ते ९ जाने.      १३ ते १५ जाने.


                 
  
      

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com