नागपुरी संत्री एपीएमसीमध्ये दाखल! किरकोळ बाजारात चढ्या दरात विक्री 

सुजित गायकवाड
Friday, 23 October 2020

पावसाळा संपताच थंडीची चाहुल लागण्यास सुरुवात होण्याआधीच आता बाजारात नागपूरच्या संत्र्यांचा हंगामही सुरू झाला आहे. नागपूरसोबत नगर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात वाशीच्या एपीएमसी बाजारात संत्री दाखल झाली आहेत. एकाच वेळेस दोन्ही भागांतून संत्र्यांचा माल येण्यास सुरुवात झाल्याने संत्र्याला  घाऊक बाजारात 8 ते 18 रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे.

नवी मुंबई : पावसाळा संपताच थंडीची चाहुल लागण्यास सुरुवात होण्याआधीच आता बाजारात नागपूरच्या संत्र्यांचा हंगामही सुरू झाला आहे. नागपूरसोबत नगर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात वाशीच्या एपीएमसी बाजारात संत्री दाखल झाली आहेत. एकाच वेळेस दोन्ही भागांतून संत्र्यांचा माल येण्यास सुरुवात झाल्याने घाऊक बाजारात संत्र्याला 8 ते 18 रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. कोरोनामुळे "सी' व्हिटॅमीन्समुळे संत्र्याला विशेष मागणी वाढल्याने बाजारात किरकोळ बाजारात संत्री चढ्या दरात 80 ते 100 रुपये किलो भावाने विक विकली जात आहेत. दरम्यान, आज तब्बल 240 टन संत्र्यांचा माल बाजारात दाखल झाला आहे. 

आज वर्षा बंगल्यावर अतिवृष्टीग्रस्त भागाच्या मदतीसाठी मंत्रिमंडळाची बैठक

कोरोनामुळे सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या फळांपैकी शरीराला पोषक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करणाऱ्या फळांच्या विक्रीला मोठी मागणी आहे. बहुतांश नागरिक शरीरातील "सी' व्हिटॅमिन्स वाढवण्यासाठी ही तत्त्वे असणाऱ्या फळाहार करीत आहेत; परंतु पावसाळ्यात संत्र्यांचा हंगाम नसल्यामुळे संत्र्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये वाशीच्या फळ बाजारात नागपूर आणि नाशिकहून मोठ्या प्रमाणात संत्र्यांची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. रोज 40 ते 45 गाडी संत्र्यांचा माल बाजारात दाखल होत आहे. परतीच्या पावसामुळे नगरहून येणाऱ्या संत्र्यांचा हंगाम लांबणीवर पडल्याने ती संत्री सुद्धा नागपूर संत्र्यांसोबत आली आहेत. दोन्ही भागातील संत्री एकाच कालावधीत आल्याने आज दिवसभरात बाजारात अंदाजे 240 टन संत्र्यांचा माल झाला होता. 

'भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्याने म्हटले की, पक्ष बदलता आला तर बदलून टाका'' - एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

बाजारात माल वाढल्याने संत्री 8 ते 18 रुपये किलोने विकली गेली. वाशीच्या बाजाराव्यतिरिक्त बोरीवली, नागपाडा, क्रोफर्ड, कल्याण, भिवंडी आणि पनवेल या भागात माल जात आहेत. गेल्या वर्षी याच दिवसांत 12 ते 25 रुपये किलोचा भाव संत्र्याला मिळाला होता. पुढील काही दिवस संत्र्यांचा हंगाम असल्याने ग्राहकांना चांगल्या दर्जाची संत्री खायला उपलब्ध होणार आहेत. 
   - संजय पानसरे, फळ व्यापारी. 

 

240 tonnes of oranges in APMC market

(संपादन ः रोशन मोरे)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  240 tonnes of oranges in apmc market