"मॉर्निंग वॉक' करणारा भाजप नगरसेवक ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

सीबीडी पोलिसांना शनिवारी सकाळी  कायदा धाब्यावर बसवून नेरूळ भागातील 17 जण पारसिक हिल टेकडीवर मॉर्निंग वॉकसाठी गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भाजपचे नगरसेवक, पालिकेतील सभागृह नेते रवींद्र इथापे यांच्यासह मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

नवी मुंबई : संचारबंदीचे उल्लंघन करून बेलापूर येथील पारसिक हिल टेकडीवर "मॉर्निंग वॉक' करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकासह 17 नागरिकांना सीबीडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. 

हे वाचा : डॉक्‍टर अभिनेता आणि पुन्हा डॉक्‍टर 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नवी मुंबईतील अनेक भाग सील करण्यात आले आहेत. पोलिसांनी नागरिकांवरील निर्बंध अधिक कडक केले आहेत. त्यानंतरही काही जण नियमांचे उल्लंघन करत आहेत.

हे वाचा : पंतप्रधान उद्या देशाला संबोधित करणार 

 सीबीडी पोलिसांना शनिवारी सकाळी अशाचप्रकारे कायदा धाब्यावर बसवून नेरूळ भागातील 17 जण पारसिक हिल टेकडीवर मॉर्निंग वॉकसाठी गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भाजपचे नगरसेवक, पालिकेतील सभागृह नेते रवींद्र इथापे यांच्यासह मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर साथीचे रोग अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सीबीडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली. लॉकडाऊननंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचेही मोहिते यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  CBD police have arrested 17 people, including a BJP councilor, who carried out a "morning walk" on Parsik Hill hill