घरगुती गॅस सिलेंडरचा भडका, एका महिलेचा मृत्यू

दीपक शेलार
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

ठाणे : ठाण्यातील पाचपाखाडी येथील आंबेडकर रस्ता भागात मंगळवारी सकाळी संदीप काकडे यांच्या घरगुती गॅस सिलेंडरचा भडका उडुन लागलेल्या आगीत दुर्दैवाने कांताबाई वानखेडे या महिलेचा मृत्यू झाला.

स्फोट झाल्यानंतर कांताबाई यांच्या अंगावर भिंत पडली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत संदीप काकडे (वय 40), हिमांशु काकडे (वय 12), वंदना काकडे (वय 50), ललिता काकडे (वय 35) हे गंभीर जखमी झाले. जखमींना ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर ऐरोलीच्या बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

Web Title: 1 lady dies in gas cylinder blast in Thane

टॅग्स