पेण-पनवेल-दिवा शटल सेवेची वर्षपूर्ती

पेण : ‘मी पेणकर, आम्ही पेणकर समिती’तर्फे पेण रेल्वेस्थानक मास्तर व रेल्वे कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देताना पदाधिकारी.
पेण : ‘मी पेणकर, आम्ही पेणकर समिती’तर्फे पेण रेल्वेस्थानक मास्तर व रेल्वे कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देताना पदाधिकारी.

पेण (वार्ताहर) : पेण-दिवा मेमु रेल्वे सेवेला आज (ता. ११) एक वर्ष पूर्ण झाल्याने या रेल्वे सेवेचा पहिला वर्धापन दिन ‘मी पेणकर, आम्ही पेणकर शाश्वत विकास समिती’तर्फे पेण रेल्वेस्थानकात प्रवाशांना साखर वाटून साजरा करण्यात आला. या वेळी गाडीमध्ये पताकाही लावण्यात आल्या होत्या.

पेणकरांनी मिळून ‘मी पेणकर, आम्ही पेणकर शाश्वत विकास समिती’मार्फत लढा उभारून केलेल्या आंदोलन केले होते. या आंदोलनाला यश मिळाल्याने ११ नोव्हेंबर २०१८ पासून पेण-दिवा ही मेमु रेल्वे सेवा सुरू झाली. आज या रेल्वे सेवेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या समितीमार्फत साधेपणाने प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे प्रथम वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय समितीतर्फे घेण्यात आला होता. त्यामुळे फक्त साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला गेला.

समितीचे अध्यक्ष योगेश म्हात्रे यांनी पेणकरांच्या सेवेसाठी शटल सेवा सुरू करून दिल्याबद्दल पेण रेल्वेस्थानक मास्तर, मोटरमन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले. पेणकरांच्या मागण्यांपैकी शटल सेवा सुरू झाली असली, तरी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी पेणकरांचा लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com