
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांंच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. ही बैठक संपन्न झाली असून या बैठकीत महत्त्वाचे १० मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये राज्यात शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाला मान्यता देण्यात आली आहे. तसेच आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांचे मानधन दुप्पट करण्यात आली आहे.