मुंब्र्यात १० कोटींची वीज बिल थकबाकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंब्र्यात १० कोटींची वीज बिल थकबाकी

ठाणे : थकीत वीज बील वसुलीसाठी सगळीकडे राज्यात जोरदार प्रयत्न सुरू असताना मुंब्रा परिसरात जवळपास ५०० जणांनी वीजबिलाची १० कोटींच्या आसपास रक्कम थकवली असल्याचे उघड झाले आहे.

मार्च २०२० पासून कळवा- मुंब्रा- दिवा परिसराच्या वीजपुरवठा व वितरणाची जबाबदारी महावितरणने फ्रेंचाईझी म्हणून टोरंट पॉवर कंपनीकडे सोपवली आहे. वारंवार सूचना देऊनही मुंब्रा परिसरात ४५० ते ५०० असे ग्राहक आहेत जे लोक वीज नियमित वापरत असूनही त्याचे बिल मात्र भरत नाहीत. यांची एकत्रित थकबाकी १० कोटींच्या घरात पोचली आहे. यात काही बड्या असामीदेखील असून टोरंट कंपनीने अशा ग्राहकांची यादी तयार केली आहे. थकीत वीज बिल भरावे यासाठी ग्राहकांना वारंवार सूचना दिल्या जात असून वीज बिल वसुलीसाठी यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही, असे कंपनीच्या सूत्रानी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai
loading image
go to top