जुईनगरमध्ये १० फुटी अजगराला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

जुईनगर रेल्वेस्थानकासमोरील झाडावर दहा फुटाच्या अजगराला पकडण्यात सर्पमित्रांना यश आले. त्यानंतर या अजगराला जंगलात सोडून जीवदान देण्यात आले. 

नवी मुंबई : जुईनगर रेल्वेस्थानकासमोरील झाडावर दहा फुटाच्या अजगराला पकडण्यात सर्पमित्रांना यश आले. त्यानंतर या अजगराला जंगलात सोडून जीवदान देण्यात आले. 

जुईनगर रेल्वेस्थानकाच्या समोरील झाडावर अजगर असल्याचे नागरिकांच्या दृष्टीस पडले. नागरिकांनी पुनर्वसू फाऊंडेशनचे सर्पमित्र माधव गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पुनर्वसू फाऊंडेशनची टीम काही क्षणात अजगराला पकडण्यासाठी घटनास्थळी पोहचली; परंतु तिथे असणारा जमाव अजगराला दगड तसेच काठीने मारत होते. त्यामुळे अजगर झाडावर वरच्या दिशेने जात होता. त्यानंतर पुनर्वसू फाऊंडेशनच्या सदस्यांनी प्रसंगावधान राखून पालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क करून टर्न टेबल लेडर हे वाहन मागवले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या वाहनाने माधव गायकवाड, गणेश गोपाले, साहिल शेख व तनय जुवेकर हे तीस फूट उंच असलेल्या झाडावर चढले. त्यांनी दहा फूट लांबीच्या अजगराला कोणतीही दुखापत न करता पकडले. त्यानंतर गवळीदेव जंगलात अजगराला सोडण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 feet dragon in Juinagar