esakal | वसई: तानसा नदीच्या पाण्याचा १० ते १२ गावांना विळखा
sakal

बोलून बातमी शोधा

वसई

वसई: तानसा नदीच्या पाण्याचा १० ते १२ गावांना विळखा

sakal_logo
By
विजय गायकवाड : सकाळ वृत्तसंस्था

नालासोपारा: तानसा धरण ओव्हर फ्लो (tansa dam overflow) झाल्याने तानसा नदीच्या पुराच्या पाण्याचा वसई ताल्युक्यातील 10 ते 12 गावांना आज गुरुवारी फटका बसला. या पुरामुळे नदी किनाऱ्यालगत (river front villages) असणाऱ्या वेगवेगळ्या गावातील 50 च्या वर घरात मध्यरात्रीच्या सुमारास पाणी शिरल्याने भीतीच्या सावट खाली आपली रात्र जागून काढावी लागली आहे. अचानक मध्यरात्रीच्या सुमारास पाणी घरात शिरल्याने (water at home) नागरिकांची एकच तारांबळ उडाली असून यात अनेकांचे संसारही वाहून गेले आहे. या सर्व पूरग्रस्त (flood) कुटुंबियांचे तात्काळ पंचनामे करून, त्यांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी केली आहे. (10 to 12 villages affected by tansa river overflow dmp82)

तानसा नदी किनाऱ्यालगत भाताने, नवसई, जाभुलपाडा, थल्याचापाडा, बेलवाडी, आडना, उसगाव, मेढे यासह आजूबाजूचे 20 ते 25 आदिवाशी पाडे आहेत. बुधवारी दुपार पासून वसई ताल्युक्यात पावसाने विश्रांती घेतली होती. पण तानसा धरण ओव्हरफ्लो झाल्याने तानसा नदीला पूर येऊन, या पुराचे पाणी आजूबाजूच्या गावात, शेतात जाऊन अक्षरशा समुद्र झाला होता. यात शेकडो नागरिकाच्या घरात पाणी शिरल्याने घरातील सामान, गहू तांदूळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या पाण्यात भिजून खराब झाल्या आहेत.

हेही वाचा: शहापूर: पुराच्या पाण्यात कुटुंब अडकल्याचं समजताच माजी आमदार दोर घेऊन धावले

मुलांना सांभाळावे की, सामान काढावे, की स्वत:चा जीव वाचवावा, त्यातच लाईट ही गेली अशी भयाण परिस्थिती पूरग्रस्त नागरिकांनी अनुभवत अक्षरशः रात्र जागून काढली. सकाळच्या वेळेत मात्र पुराचे पाणी ओसरायला सुरवात झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच बोईसर विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे आ राजेश पाटील, वसई च्या तहसीलदार उज्वला भगत, भाताने ग्रा. पं. चे उपसरपंच प्रणय कासार, ग्रामसेवक नितीन राणे यांनी आज गुरुवार ता 22 रोजी सकाळीच पूरग्रस्त भागाला भेट देऊन, ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले, ज्यांचे नुकसान झाले त्यांची पाहणी ही केली आहे.

हेही वाचा: पालघरच्या आदिवासी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, जाणून घ्या स्थिती

तानसा धरण ओव्हर फ्लो झाल्यावर पूर्व पट्टीतील राहिवाशांना, शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतो. दोन ते तीन दिवस पाणी ओसरत नसल्याने भाताशेतीचेही नुकसान होते. यांच्यावर कायम स्वरूपी उपाय योजना करण्यासाठी मी शासनस्तरावर पाठपुरावा करत असून, पांढर तारा पुला जवळ एक मोठा ब्रिज आणि राष्ट्रीय महामार्ग वरील पुलाची रुंदी वाढविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आ राजेश पाटील यांनी सांगितले आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या पुराने अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. त्याचे तात्काळ पंचनामे करावेत अशा सूचना मी माझ्या तालाठ्याना दिल्या आहेत. लवकरच पंचनामे पूर्ण करून शासनाकडून जी काही रक्कम मंजूर होईल ती आम्ही तात्काळ पूरग्रस्त राहिवाशाना देऊ असे वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांनी सांगितले आहे.

loading image