esakal | पालघरच्या आदिवासी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, जाणून घ्या स्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर

पालघरच्या आदिवासी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, जाणून घ्या स्थिती

sakal_logo
By
भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा

मोखाडा-  पालघर जिल्ह्यातील (Palghar district) जव्हार, वाडा, विक्रमगड आणि मोखाडा या आदिवासी तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला आहे. या चारही तालुक्यात सरासरी  300  मीमी विक्रमी पावसाची (heavy rain) नोंद झाली आहे. या भागात दरडी कोसळल्याने (land slide) अनेक मार्ग बंद झाले आहेत. रस्ता व मोरीचा भाग खचल्याने जव्हार (jawahar) मध्ये  10  गावांचा संपर्क तुटला आहे तर पहिल्यांदाच जव्हार शहरातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. (In palghar area very heavy rain know situation in palghar dmp82)

मोखाड्यात प्रमुख राज्यमार्गावर दरड कोसळल्याने तालुक्याचा संपर्क तुटून वाहतूक ठप्प झाली आहे. तर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे या सर्व तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघरच्या आदिवासी तालुक्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र, बुधवारी  21  जुलैला पावसाने कहरच केला ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

हेही वाचा: शहापूर: पुराच्या पाण्यात कुटुंब अडकल्याचं समजताच माजी आमदार दोर घेऊन धावले

समुद्र सपाटीपासून  1800  फूटावर, जिल्ह्यात सर्वात ऊंच असलेल्या जव्हार शहरात प्रथमच घरांमध्ये पाणी शिरले आहे. जव्हार- पाथर्डी रस्त्यावरील मोरीचा भराव वाहुन गेल्याने रस्ता खचला आहे. त्यामुळे साकुर, धानोशी, कडाचीमेट, रामखींड, पाथर्डी, डोंगरपाडा, वांगणपाडा, ऐना आणि खिडसा या गावांचा जव्हारशी संपर्क तुटला आहे. तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली आहे. शहरातील  आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयाची संरक्षक भिंत कोसळल्याने दोन घरांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: धरणे वाहू लागली ओसंडून; 53 टक्के भरल्याने संपले टेंशन

मोखाडा तालुक्यातील मोखाडा -त्र्यंबकेश्वर रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. खोडाळा -त्र्यंबकेश्वर,  खोडाळा - कसारा आणि खोडाळा - वाडा या मार्गावर ठिक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील वाहतूक बंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतांचे बांध फुटले असून शेतात दगड, माती आणि गोट्यांनी पीकाचे नुकसान झाले आहे.

कधी नव्हे एवढा जव्हार शहरात  434 तर वाडा शहरात  418  मी मी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात वाडा - 354 : 75  मी मी,   जव्हार-  344: 66  मी मी,   मोखाडा - 292 : 2 आणि विक्रमगड मध्ये  165  मी मी सरासरी नोंद झाली असून या चारही तालुक्यात सरासरी  300  मी मी पाऊस बरसला आहे. सन  2003  नंतर अशी स्थिती तालुक्यात उदभवल्याचे बोलले जात आहे. आज पावसाचा जोर ओसरला असून कोसळलेल्या दरडी काढण्याचे काम, प्रशासनाने युध्दपातळीवर सुरू केले आहे.

loading image