Mumbai local Train News: जीवघेण्या लोकल गर्दीत आता १०० कंत्राटी फेरीवाले; मध्य रेल्वेचा धोकादायक प्रयोग!

safety concerns over hawkers in Mumbai suburban railway: मुंबई लोकलमधील जीवघेण्या गर्दीतच १०० कंत्राटी फेरीवाल्यांना परवानगी; २०२३ च्या वादानंतरही प्रवासी संघटनांना डावलून मध्य रेल्वेचा गुप्त प्रयोग, सुरक्षेपेक्षा महसूलालाच प्राधान्य?
Heavy rush in Mumbai local trains as Central Railway allows contractual vendors, raising safety concerns.

Heavy rush in Mumbai local trains as Central Railway allows contractual vendors, raising safety concerns.

ESakal

Updated on

-नितीन बिनेकर

मुंबई : आधीच जीवघेण्या गर्दीने त्रस्त असलेल्या मुंबईच्या उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये पुन्हा एकदा फेरीवाल्यांना अधिकृत परवानगी देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर मिळून १०० अधिकृत फेरीवाल्यांचे कंत्राट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. २०२३ मध्ये याच निर्णयावर तीव्र वाद निर्माण झाल्यानंतर रेल्वेने माघार घेतल्याचे चित्र होते. मात्र आता पुन्हा प्रवासी संघटनांना विश्वासात न घेता गुपचूप निविदा प्रक्रिया राबवून हे कंत्राट देण्यात आल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भातील अधिकृत कागदपत्रे सकाळच्या हाती लागली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com