esakal | मुंबईत लसीकरणाची आणखीन १०० केंद्र उभारणार- महापौर

बोलून बातमी शोधा

Mayor Kishori Pednekar
मुंबईत लसीकरणाची आणखीन १०० केंद्र उभारणार- महापौर
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोकांना लस देण्याचा प्रयत्न असेल, असं म्हटलं. तसंच मुंबईत १०० केंद्र उभारली जाणार असल्याचंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. ऑक्सिजन तुटवड्याबाबतीत विशाखापट्टणम येथून २३५ मेट्रिक टनचा साठा आणला जातोय. तीन रुग्णालयांना लिक्विड ऑक्सिजनची परवानगी दिली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

लोकलच्या तिन्ही मार्गावर लसीकरण केंद्र उभी करण्यावर भर देणार होणार आहोत, असं महापौरांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. १ मे पासून सर्वांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी केंद्र वाढवणे. लस देण्याचे प्रशिक्षण देणे. केंद्र आणि राज्याने ५०% खर्च करायचा आहे. ज्या लसींना वापरासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. पुढील दहा दिवस महत्वाचे आहे. रुग्ण संख्या जरी स्थिर दिसली तरी ती भीतीदायक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: 'कदाचित ही अखेरची शुभसकाळ', कोरोनाग्रस्त डॉक्टरची शेवटची पोस्ट

सरकारनं लॉकडाऊन संदर्भात जी वेळ ठरवली आहे. ती सर्वांची मतं घेऊन ठरवण्यात आली आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेत नागरिकांनी गर्दी न करता नियम पाळून सहकार्य करावे. हे नियम नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहेत, असं आवाहनही महापौरांनी नागरिकांना केलं आहे. तर्क वितर्क काढायची ही वेळ नाही, मी सुरक्षीत तर कुटुंब सुरक्षित, असंही त्या म्हणाल्यात.

हेही वाचा: कडक निर्बंध: '७ ते ११ वेळेमुळे आणखी गर्दी वाढण्याची भीती'

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी लस घेतली. त्यांचं वय २३ आहे. या वयोमर्यादेला परवानगी नसतानाही त्यांनी लस घेतली. त्यानंतर बरंच राजकारण रंगलं. त्यावर महापौरांनी भाष्य केलं आहे. तन्मय फडणवीस यांनी मुंबईतल्या सेव्हन हिल रुग्णालयातून लस घेतली. त्यांचे वय लहान आहे. याबाबत चौकशी केली. मात्र मला अजून त्याची माहिती मिळालेली नाही. तन्मयनं थांबायला हवं होतं, असं महापौर म्हणाल्या आहेत.

100 more immunization centers be set up Mumbai Mayor Kishori Pednekar