नव्या 100 लोकल दीड वर्ष यार्डातच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

मुंबई : मध्य रेल्वेमार्गावर पाचवा आणि सहावा मार्ग टाकण्याचे काम अतिक्रमणामुळे रखडले आहे. चार वर्षांपासून काम रखडल्यामुळे खर्च 278 कोटींवरून 440 कोटी रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेला 100 नव्या फेऱ्या सुरू करण्यातही अडचणी येत आहेत. रेल्वेच्या जागेवरील व मार्गालगतची अतिक्रमणे, ती हटवण्यास होणारा विरोध, अपुरा निधी आदी मुद्दे रेल्वेसमोर डोकेदुखी ठरत आहेत. 

मुंबई : मध्य रेल्वेमार्गावर पाचवा आणि सहावा मार्ग टाकण्याचे काम अतिक्रमणामुळे रखडले आहे. चार वर्षांपासून काम रखडल्यामुळे खर्च 278 कोटींवरून 440 कोटी रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेला 100 नव्या फेऱ्या सुरू करण्यातही अडचणी येत आहेत. रेल्वेच्या जागेवरील व मार्गालगतची अतिक्रमणे, ती हटवण्यास होणारा विरोध, अपुरा निधी आदी मुद्दे रेल्वेसमोर डोकेदुखी ठरत आहेत. 

एक्‍स्प्रेस गाड्यांचा लोकलच्या मार्गावर येणारा भार कमी करण्यासाठी रेल्वेने 2008-09 मध्ये पाचवा-सहावा मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला; मात्र ठाणे ते दिवादरम्यान असलेले अतिक्रमण आणि पारसिक डोंगरातील बोगद्यामुळे काम रखडले आहे. पारसिक डोंगरात नवा बोगदा बांधायचा झाल्यास जुन्या बोगद्याला धोका निर्माण होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन मुंबई रेल्वे विकास बोर्डाने तिथे पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचा विचार केला. कल्याणमध्येही बोगदा बांधावा लागणार आहे. कुर्ला ते सीएसटीपर्यंतचा पाचवा-सहावा मार्ग अतिक्रमणामुळे रखडला आहे. ठाणे-दिव्यापर्यंत दोन नवे मार्ग सुरू करण्यासाठीचा सुरुवातीचा खर्च 287 कोटी होता; मात्र तो आता 440 कोटींवर गेला आहे. अडथळ्याच्या शर्यतीमुळे 2017 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेला मार्ग 2019 पर्यंत प्रत्यक्षात येण्याची शक्‍यता आहे. 

सीएसटी-कुर्ल्यादरम्यान नवे रूळ टाकण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळेही पेच निर्माण झाला आहे. सीएसटीपासून कल्याणपर्यंतचा मार्ग तयार झाल्यावर मध्य रेल्वेला 100 नव्या लोकल सुरू करता येणार आहेत, अशी माहिती रेल्वे विकास बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने दिली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्‍विनी लोहानी दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असून, त्यादरम्यान त्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. 

मुंबई सेंट्रल-वांद्रे सहावा मार्ग 2021 पर्यंत 
पश्‍चिम रेल्वेच्या पाचव्या-सहाव्या मार्गासाठीही दोन हजार 184 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात बोरिवली ते वांद्रेपर्यंतचे काम 2019 पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर मुंबई सेंट्रल ते वांद्रेपर्यंत सहावा मार्ग टाकण्याचे काम मार्च 2021 पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्या प्रकल्पातही बेकायदा बांधकामाचा अडथळा आहे. विलेपार्ले, मालाड आणि बोरिवलीदरम्यान खासगी व सरकारी जमीन ताब्यात घेण्याचे आव्हान रेल्वे प्रशासनापुढे आहे. 

Web Title: 100 new local are in yard from last one and half year