मुंबईतील गोखले ब्रीजमुळे दररोज १०० शाळकरी बसेसची रखडपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School Bus

मुंबईतील गोखले ब्रीजमुळे वाहतूक कोंडीमुळे आता सामान्य नागरिकांसोबत शाळेच्या मुलांनाही या सगळ्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे.

मुंबईतील गोखले ब्रीजमुळे दररोज १०० शाळकरी बसेसची रखडपट्टी

मुंबई - मुंबईतील गोखले ब्रीजमुळे वाहतूक कोंडीमुळे आता सामान्य नागरिकांसोबत शाळेच्या मुलांनाही या सगळ्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे. त्यामुळेच वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पालकांकडूनच आता शाळांची वेळ बदलण्याची मागणी पुढे येत आहे. येत्या काळात परीक्षांचा कालावधी पाहता ही मागणी जोर धरू लागली आहे. तर अनेकांनी ऑनलाईन शिक्षणासाठीची मागणी केली आहे.

गोखले ब्रीजच्या दुरूस्तीमुळे अनेक शाळकरी मुलांच्या बसेस या वाहतूक कोंडीत अडकत आहेत. त्यामुळेच शाळांचा कालावधी बदलण्यात यावा अशीही मागणी पुढे येत आहे. शाळेच्या मुलांना पोहचवण्यासाठी बस चालकांचीही तारेवरची कसरत होत आहे. तर दुसरीकडे शाळकरी मुलांना शाळेत पोहचवताना वेळेत पोहचवण्यासाठी मोठी कसरत होत आहे. अनेक पर्यायी मार्गांमुळे शाळेच्या वेळेत बस पोहचत नसल्याची तक्रार आहे. त्याचा परिणाम हा शाळेतून सुटलेल्या मुलांनाही बसेस वेळेत न मिळण्यावर होत आहे. त्यामुळेच अर्धा तास शाळा लवकर सोडण्याची मागणी बसेस ऑपरेटर्सकडून होत आहे.

वाकोला वाहतूक पोलिसांनी बसेसना विलेपार्ले फ्लायओव्हर वापरण्यासाठी मज्जाव केला आहे. त्यातच अनेक बसेस या ५.३० च्या सायंकाळच्या कालावधीत सुटत असल्यानेच अनेक बस चालक आणि मदतनीस यांनी या वाहतूक कोंडीला कंटाळून काम करण्यासाठी नकारघंटा वाजवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आम्ही विविध यंत्रणांकडे पाठपुरावा करत आहोत. तसेच सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे अशीही मागणी करण्यात येत आहे. आम्ही येत्या दिवसांमध्ये सह आयुक्त वाहतूक यांना आमच्या मागण्या मांडणार आहोत. त्यामध्ये शाळेच्या बसेसला वाहतुक कोंडीतून प्राधान्याने सोडवण्यासाठी मदत करावी आमची मागणी वाहतूक पोलिसांकडे आहे.

शाळांच्या व्यवस्थापनालाही आम्ही अर्धा तास आधीच शाळा सोडावी अशी मागणी आम्ही करत आहोत. हा कालावधी शाळांनी ऑनलाईन पद्धतीने भरून काढावा अशी मागणी आम्ही शालेय व्यवस्थापनाला केली आहे. तर दुसरीकडे वाहतूक पोलिसांनीही सहकार्य करावे अशीही मागणी आम्ही करत आहोत. सरासरी दीड तास हा फक्त वाहतूक कोंडीत जात असल्याची प्रतिक्रिया स्कुल बस ऑपरेटर्स असोसीएशनचे अनिल गर्ग यांनी दिली. शाळकरी मुलांसोबतच मदतनीस आणि ड्रायव्हरही या वाहतूक कोंडीला कंटाळले आहेत.

अंधेरी पूर्व आणि पश्चिम अशा शाळांसाठी सुमारे १०० बसेस अंधेरी भागात चालतात. परंतु बहुतांश बसेस या मात्र वाहतूक कोंडीतच अधिकाधिक वेळ घालवत आहेत. त्यामुळेच आम्ही शाळकरी मुलांना घ्यायलाही लवकर जात असून शाळा सुटल्यावर वाहतूक कोंडीत वेळ जात असल्याने मुलांना दोन खाण्याचे डबे आणण्याची परिस्थिती ओढावली असल्याचेही गर्ग म्हणाले.

टॅग्स :MumbaiBridgeschool bus