कल्याणमधील 104 वर्ष जुना पत्रिपुल इतिहास जमा होणार 

रविंद्र खरात 
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

कल्याण :  कल्याण शहरातील 104 जुना पत्रिपुल आज (ता 18) इतिहास जमा होणार असून रेल्वेची तयारी पूर्ण झाली असून सकाळी सव्वा नऊ पासून जुना पत्रिपुल तोडण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. 

कल्याण शिळफाटा रोड रेल्वे लाईन वरून जाणारा 104 वर्ष जुना पत्रिपुल धोकादायक झाल्याने तो रेल्वे मार्फत तोडण्यात येणार असून त्या दिवशी सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे तीन या कालावधीत 6 तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे . कल्याण ते डोंबिवली रेल्वे सेवा बंद करण्यात येणार असून कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत आणि डोंबिवली ते सिएसटीएम दरम्यान विशेष लोकल रेल्वे प्रशासन सोडणार आहे . 

कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान केडीएमटीने नऊ वाजल्यापासून विशेष बस सोडणार आहे. तर थोड्याच वेळात जुना पत्रिपुल तोडण्याच्या कामाला सुरुवात होणार असून एका कल्याण शहरातील 104 जुना पत्रिपुल इतिहास जमा होणार आहे

Web Title: 104 year old bridge in Kalyan will be accumulated History