बाबांनो घरात राहा; कोरोना जाईल पण केसेस राहतील डोक्यावर, फटक्यांच्या पुढची स्टेज हीच...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण राज्यात जारी करण्यात आलेले  जमाबंदी आदेश मोडल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 112 गुन्हे दाखल केले आहेत.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण राज्यात जारी करण्यात आलेले  जमाबंदी आदेश मोडल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 112 गुन्हे दाखल केले आहेत. त्यात घरात विलीगीकरण करण्यात आलेल्या तिघांचाही समावेश आहे. प्रशासनाने त्यांना घरातच विलिगीकरण करण्याची सक्त ताकीद दिली होती. पण त्यानंतर त्यांनी बाहेर पडून इतरांचा जीवी धोक्‍यात घातल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. याशिवाय जमावबंदीनंतर दक्षिण मुंबईतील मशीदीत दिडशे लोक जमा झाल्याप्रकरणीही पोलिसांनीा विश्वस्तांसह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. 

नागरीकांकडून जमावबंदीचे उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभुमीवर मुंबई पोलीस आयुक्तांनी काल म्हणजेच सोमवारी शहरात 188 अन्वये कारवाई करण्याचे आदेश पोलिस दलाला दिले आहेत. याबाबत पोलिसांना नियंत्रण कक्ष व ट्‌वीटरद्वारे अनेक तक्रारीही आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ कारवाई केली. 

मोठी बातमी - मुंबईतून आली कोरोनासंदर्भात अत्यंत दिलासादायक बातमी

कलम 144 च उल्लघन केल्याप्रकरणी शहरात 112 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विलीगीकरण करण्यात आलेल्या तिघांवर, हॉटेल आस्थापना बाबत16, पान टपरी 6, इतर दुकाने 53, फेरीवाले 18, सार्वजनिक ठिकाणी गर्दी 10 आणि अवैध वाहतुक संदर्भात 6 गुन्ह्यांचा समावेश आहे. हे सहा कार चालक गरज नसताना तसेच अत्यावश्‍यक सेवांची वाहने चालू ठेवण्याचा आदेश असतानाही आपल्या गाड्या घेऊन घरात बाहेर पडले होते.

याशिवाय टेमकर स्ट्रीट येथील सुनी शाफी मशीदीत नमाजासाठी दिडशे नागरीक जमा झाल्याप्रकरणीही कलम 188 अंतर्गत मशीदीचे विश्वस्त मजल बडवण कुणी मोहम्मद अणि इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्रअद्याप याप्रकरणी कोणाला अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

COVID19 : कोरोनाबाबत नसत्या अफवा पसरावणाऱ्यांच्या तोंडावर मारा 'ही' बातमी

याशिवाय विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळ मुलांनाही लाठीचा प्रसाद देण्यात आला. पोलिसांकडून नागरीकांना वारंवार घरी राहण्याची विनंती केल्यानंतरही काही जण विनाकारण घरातून बाहेर पडत होते. त्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना कडक पावले उचलावी लागत आहेत. नागरीकांनी यातूनही धडा न घेतल्यास पोलिस पुढील दिवसात आणखी कठोर कारवाई करण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. 

112 cases registered for violating section 144 in mumbai due to corona virus spread 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 112 cases registered for violating section 144 in mumbai due to corona virus spread