esakal | मुंबईतून आली कोरोनासंदर्भात अत्यंत दिलासादायक बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतून आली कोरोनासंदर्भात अत्यंत दिलासादायक बातमी

टेस्ट निगेटिव्ह आल्याने आता कस्तुरबा रुग्णालयातील  हे १२ नागरिक आता कोरोना मुक्त झालेत असं म्हणू शकतो

मुंबईतून आली कोरोनासंदर्भात अत्यंत दिलासादायक बातमी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईसाठीची आणि महाराष्ट्रासाठीची अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी मुंबईतून समोर येतेय. मुंबईमधील कस्तुरबा रुग्णालयात १२ रुग्णांच्या दुसऱ्यांदा कराव्या लागणाऱ्या कोरोना टेस्ट या निगेटिव्ह निघाल्या आहेत. याचाच अर्थ त्या १२ जणांना आता कोरोनाची लागण नसल्याचं स्पष्ट झालंय. टेस्ट निगेटिव्ह आल्याने आता कस्तुरबा रुग्णालयातील हे १२ नागरिक आता कोरोना मुक्त झालेत. कस्तुरबा रुग्णालयात हे १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले होते. दरम्यान आज त्यांची दुसऱ्यांदा करावी लागणारे टेस्ट आज पार पडली आणि या टेस्टमध्ये हे १२ नागरिक निगेटिव्ह झालेत. 

मोठी बातमी...ती चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ!

दिलासा मिळाला पण काळजी हवीच 

आज ज्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यात अशाना काळजी घेण्यासाठी सांगण्यात आलाय. या १२ नागरिकांना यापुढील १४ दिवस स्वतःला आयसोलेशन म्हणजेच विलगीकरणात ठेवावं लागणार आहे. स्वतःला इतरांच्या संपर्कात येऊ नका हे सांगण्यात आलंय. त्यामुळे दिलासा जरी मिळाला असला तरीही काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय. 

सावधान ! हँड सॅनिटायझर वापरून लगेच जेवण बनवाल तर होत्याचं नव्हतं होईल..

यापूर्वी पुणे आणि औरंगाबादेतून दुसऱ्यांदा करण्यात येणाऱ्या चाचण्या निगेटिव्ह येत होत्या. दरम्यान आता मुंबईमधून देखील ही दिलासादायक बातमी समोर येतेय. जरी पुढील १४ दिवस या सर्वांना क्वारंटाईनमध्ये राहण्यासाठी सांगण्यात आलं असलं तरीही आज समोर आलेली ही बातमी महाराष्ट्रासाठी गुड न्यूजच आहे. 

good news from mumbai twelve citizens detected negative from mumbai kasturba 

loading image