11 वी प्रवेश मुदतवाढ संपली, तब्बल इतके 'हजारो' विद्यार्थी आहेत प्रवेशापासून दूर

11 वी प्रवेश मुदतवाढ संपली, तब्बल इतके 'हजारो' विद्यार्थी आहेत प्रवेशापासून दूर

मुंबई:  मागील चार महिन्यापासून मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून राबवण्यात आलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेशाची मंगळवारी अखेरची मुदत संपली. या मुदतीदरम्यान राज्यात उपलब्ध असलेल्या 5 लाख 59 हजार 195 जागांपैकी 1 लाख 81 हजार 619 म्हणजेच 32.48 टक्के जागा रिकाम्या राहिल्या आहेत. 

रिक्त राहिलेल्या जागांमध्ये  सर्वाधिक 97 हजार 99 जागा या  मुंबई महानगर क्षेत्रातील असून राज्यभरात तब्बल 71 हजार 68 विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून दूर राहिले आहेत.

मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या महानगर क्षेत्रात अकरावी प्रवेशासाठी यंदा 5 लाख 59 हजार 195 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी 4 लाख 48 हजार 644 विद्यार्थ्यांनी या प्रवेशासाठी अर्ज केले होते. तब्बल तीन महत्त्वाच्या प्रवेश फेरी, आणि त्यानंतर दोन विशेष प्रवेश फेरी आयोजित करून प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी  या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीची संधी शिक्षण संचालनालयाकडून उपलब्ध करून देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ही फेरी आयोजित करून विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या महाविद्यालयातील रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश घेण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर राज्यात 3 लाख 77 हजार 576 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यातील त्यानंतरही राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये तब्बल 1 लाख 81  हजार 619 जागा रिक्त राहिल्या आहेत. 

मुंबई विभागात यंदा अकरावी प्रवेशासाठी  3 लाख 20 हजार 750 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी 2 लाख 60 हजार 9 विद्यार्थ्यांनी या प्रवेशासाठी अर्ज केले होते. तर यापैकी केवळ 2 लाख 23 हजार 651 विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत प्रवेश घेतले आहेत. तर तब्बल 97 हजार 99 जागा मुंबई विभागात रिक्त राहिल्या आहेत. या प्रवेशानंतर मुंबई विभागात 36 हजार 358 विद्यार्थी प्रवेशापासून दूर राहिले आहेत.

यंदाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राज्यभरात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने नव्याने मान्यता घेतलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या अडचणीत भर पडणार आहे. विद्यार्थी संख्या अपुरी मिळाल्याने त्यांना आपली महाविद्यालय चालवणे कठीण होणार आहे.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

11th admission deadline expired more than 71 thousand students in waiting list

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com